मेष:-

11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?
falgun purnima 2024
फाल्गुन पोर्णिमेला निर्माण होतेय दुर्मिळ युती! या ३ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल! प्रगतीसह मिळेल बक्कळ पैसा

स्वकर्तुत्ववार अधिक भर द्यावा. प्रयत्नाने बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील. प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा. कामातून समाधान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

वृषभ:-

गुंतवणूक सावधानतेने करावी. देवघेवीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. कलाक्षेत्राला चांगला काळ आहे.  महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील.

मिथुन:-

बोलतांना संयम राखावा. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. मनातील भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. आत्मविश्वास कायम ठेवावा.

कर्क:-

मनातील धैर्य वाढवावे लागेल. आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल. कार्यालयीन वातावरण उत्तम राहील. मनाची द्विधावस्था दूर करावी. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका.

सिंह:-

फार रोखठोक भूमिका घेऊ नका. सामंजस्याने परिस्थिती हाताळा.  उगाच घुसमट होऊ देऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. हितशत्रूवर मात करता येईल.

कन्या:-

दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवा. अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल. वेळ हातची जाऊ देऊ नका. ज्येष्ठाशी सल्लामसलत करावी. हातच्या कामात यश येईल.

तूळ:-

विरोधाला सामोरे जावे लागू शकते. मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे. अनावश्यक खर्च त्रस्त करू शकतो. मनात उगाचच चिंता निर्माण होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.

वृश्चिक:-

अचानक आलेल्या संधीचे सोने करावे. काही जुगारी निर्णय घ्यावे लागू शकतात. कामाच्या विस्ताराचा विचार कराल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. क्रोधवृत्तीत वाढ होऊ शकते.

धनू:-

आर्थिक गणित जमून येईल. जुनी गुंतवणूक कमी येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक कराल. आलेल्या संधीचे सोने करावे. कामात द्विधावस्था आड आणू नका.

मकर:-

चिकाटी सोडून चालणार नाही. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे. अंगीभूत कलांना वाव द्यावा. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

कुंभ:-

बोलतांना इतरांची मने दुखवू नका. वर्तमान काळाचा जास्त विचार करावा. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल.

मीन:-

कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे. कामाचा उत्साह वाढेल. वेळोवेळी ज्येष्ठाशी चर्चा करावी. क्रोधवृत्तीत वाढ होईल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर