मेष:-

रेस जुगारातून लाभ संभवतो. नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

वृषभ:-

कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.

मिथुन:-

जवळचा प्रवास आनंददायी होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका.

कर्क:-

कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वाता वरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

सिंह:-

तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील.

कन्या:-

अतिविचार करत बसू नका. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत.

तूळ:-

कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता पायास किरकोळ इजा संभवते.

वृश्चिक:-

पैशांची उधळपट्टी टाळावे. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल  कर्तृत्व दाखवण्याची  संधी सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू:-

क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. वडिलोपार्जित कामे निघतील. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल.

मकर:-

शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये.

कुंभ:-

बौद्धिक ताण राहील. कामाचा  वाढता व्याप लक्षात घ्यावा. वडीलधार्‍यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा.

मीन:-

कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर