मेष:-

तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून  सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Rahu-Ketu rashi parivartan 2024
‘या’ चार राशी कमावणार पैसाच पैसा; राहू-केतूचे राशी परिवर्तन देणार मानसन्मान आणि गडगंज पैसा
Horoscope 2025 Malavya rajyog in meen shukra gochar
Malavya Rajyog 2025 : नवीन वर्षात ‘या’ राशींची होणार आर्थिक भरभराट! मालव्य राजयोगामुळे बनाल अमाप संपत्तीचे मालक अन् घराचे स्वप्न होईल पूर्ण
shani nakshatra gochar 2024
पुढचे ११७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत

वृषभ:-

सहकार्‍यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधि मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

मिथुन:-

राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रूसवे फुगवे संभवतात. नसते साहस करू नका.

कर्क:-

कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो.

सिंह:-

कामानिमित्त बराच प्रवास करावा लागेल. पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. पर्यटनाचा विचार मनात येईल. घराचे सुशोभीकरण काढाल.

कन्या:-

पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतेही गोष्ट अती करू नये. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आलेल्या संधीचे सोने करावे.

तूळ:-

सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका.

वृश्चिक:-

तुमच्यातील कलागुणांची वाढ होईल. प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. योगायोगाची खात्री करावी. तुमचा  अंदाज अचूक ठरेल. मौज मजेकडे कल राहील.

धनू:-

वाहन विषयक कामे निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. कौटुंबिक सुख-शांती जपावी. अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मकर:-

आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. व्यवसायिकांनी सजगता दाखवावी. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. कागदपत्रांवर विचारपूर्वक सह्या कराव्यात. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.

कुंभ:-

प्रकृतीची हेळसांड करू नये. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.

मीन:-

चांगला आर्थिक लाभ होईल. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. मुलांची काळजी लागून राहील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader