आजचं राशीभविष्य, बुधवार, १७ नोव्हेंबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींच्या कामात काही बदल घडून येतील. जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

मोठा प्रवास करता येईल. अचानक घडामोडी घडतील. कामाचे व्यवस्थापन करण्यात दिवस निघून जाईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या.

वृषभ:-

मनाची चंचलता जाणवेल. मुलांकडून आनंद मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. हितशत्रू पराभूत होतील. हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल.

मिथुन:-

कामात काही बदल घडून येतील. जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल. धावपळ करावी लागेल. दिवस संमिश्रतेत जाईल. मित्रांशी झालेला संवाद मन प्रसन्न करून जाईल.

कर्क:-

लहान प्रवास घडेल. घरगुती कामात व्यस्त राहाल. घरातील टापटिपीकडे अधिक लक्ष द्याल. नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. व्यावसायिकांनी अधिक परिश्रम घ्यावेत.

सिंह:-

अडकलेल्या कामांना जोर लावावा. नशीबाची साथ मिळेल. व्यापारी वर्गाला सहकार्‍याकडून मदत मिळेल. बोलण्यातील गोडवा कायम ठेवा. हस्तकलेसाठी वेगळा वेळ राखून ठेवा.

कन्या:-

घरातील गोष्टी मनाप्रमाणे घडतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची विचारपूर्वक अंमल बजावणी कराल. हातात काही अधिकार येतील.

तूळ:-

क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. आनंदाची अनुभूती घ्याल. मिळकतीची नवीन स्त्रोत सापडतील.

वृश्चिक:-

नियोजनबद्ध कामे करा. मुलांची स्वतंत्र मते जाणून घ्या. क्रोध वृत्तीला आवर घाला. कामकाज सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

धनू:-

नातेवाईकांना मदत कराल. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा. स्वत:च्या हिंमतीवर कामे हाती घ्याल. तरुण लोकांशी मैत्री होईल. कामात स्त्रियांची मदत लाभेल.

मकर:-

महत्त्वाचे निर्णय हाती लागू शकतात. कमिशनमधून लाभ कमवा. दिनक्रम व्यस्त राहील. आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका.

कुंभ:-

मनाविरुद्ध गोष्टी करू नका. संभ्रमीत अवस्थेत निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन सुखमय असेल. जवळचा प्रवास चांगला होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना मान मिळेल.

मीन:-

विचार सतत बदलू नका. तडकाफडकी गोष्टी करू नका. कुटुंबासमवेत वेळ घालवा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 17 november 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

Next Story
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २ डिसेंबर २०१६Astrology, horoscope, आजचे राशीभविष्य
ताज्या बातम्या