Today Rashi Bhavishya, 17 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दुसर्‍यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

हट्टीपणे वागू नका. बुद्धिमत्तेचे दर्शन घडवा. अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

भागीदारीत फायदा होईल. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. अनेक कामे अंगावर पडू शकतात. जबाबदार्‍यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.

सिंह (Leo Horoscope Today ):-

दुसर्‍यास समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. निराशेचे बळी होऊ नका. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करू नका. अति कामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ (Libra Horoscope Today ):-

इतरांशी व्यवहाराने वागाल. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केन्द्रित करावे. प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

अतिसाहस करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दुसर्‍याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैर फायदा घेऊ देऊ नका. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. नियोजनाने वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. प्रवासात सावधानता बाळगा.

मीन (Pisces Horoscope Today ):-

दिवस उत्साहात व आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग. जोडीदाराची प्रगति होईल.  परदेशात जाण्याची संधी चालून येईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader