मेष:-

आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकार्‍यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व
Rahu And Shukra Conjunction
होळीनंतर राहू-शुक्रची होणार युती! या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येईल आनंद, धनलाभासह मिळेल नव्या नोकरीची संधी

वृषभ:-

जुगाराची हौस पूर्ण कराल. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल. नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन:-

घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.

कर्क:-

जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.

सिंह:-

मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

कन्या:-

दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.  उत्तम गृहसौख्य लाभेल.

तूळ:-

आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल. वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

वृश्चिक:-

संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.  

धनू:-

योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे.

मकर:-

सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.

कुंभ:-

आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

मीन:-

कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर