मेष:-

भागिदारीतून अपेक्षित लाभ होईल. थोडीफार खरेदी केली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.

वृषभ:-

कलहकारक वातावरण टाळावे. गरजेच्या वस्तु खरेदी केल्या जातील. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल.

मिथुन:-

ठामपणे निर्णय घ्यावे लागतील. भावनिक ताण कमी करावा. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. आपल्याच मतावर अडून राहू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

कर्क:-

जोडीदाराचे मत विचारात घ्या. गनीमी काव्याचा वापर कराल. हट्टीपणे वागाल. संयमाने काम साधावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवावी लागेल.

सिंह:-

सकारात्मकता कमी पडू देऊ नका. तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. मनावरील चिंतेचे मळभ दूर होईल. मुलांवरील विश्वास घट्ट होईल. उत्साहाने कामे तडीस न्याल.

कन्या:-

मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. तडजोडीला पर्याय नाही. संयम सोडून चालणार नाही. कौटुंबिक कामात लक्ष घालावे लागेल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.

तूळ:-

मनात विशिष्ट हेतु घेऊन काम कराल. दिवस धावपळीत जाईल. हातातील कामात यश येईल. आपल्या आवडत्या गोष्टीत रमून जाल. ऊर्जा आणि उत्साह वाढेल.

वृश्चिक:-

उत्तराला प्रत्युत्तर द्याल. हमालीची कामे करणे टाळावे लागेल. कर्जाची प्रकरणे हातावेगळी करावीत. शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. बौद्धिक दिमाख दाखवाल.

धनू:-

माणसामाणसातील फरक ओळखावा. दिवस कामाने व्यापलेला राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जुन्या गोष्टींनी त्रस्त होऊ नका.

मकर:-

कामाची रूपरेखा ठरवा. स्वावलंबन असणे आवश्यक आहे. दान-धर्म करण्याचा विचार कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तुमच्या ज्ञानात भर पडेल.

कुंभ:-

इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा. विशाल दृष्टीकोन बाळगाल. नवीन मित्र जोडावेत. व्यावसायिक गोष्टीवर अधिक भर द्याल.

मीन:-

वाढीव कामे मागे लागू शकतात. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी. जबाबदारी टाळून चालणार नाही. आततायीपणा आड येऊ देऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर