scorecardresearch

Premium

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक कामाचा भार उचलावा. आरोग्याकडे लक्ष द्या.

Astro new
राशीभविष्य ३१ डिसेंबर, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 18 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
7th March After 18 Years Budh Rahu Yuti In Meen Rashi These Five Zodiac Signs Kundali 360 degree Turn Can Become Crorepati
१८ वर्षांनी बुध-राहू युती बनल्याने एका झटक्यात ‘या’ ५ राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही होणार कोट्याधीश?
Mars Mercury Venus Saturn conjunction will make in kumbh these zodiac will be lucky Mangal Shukra Shani Yuti
३० वर्षांनंतर शनी, मंगळ अन् शुक्राचा अद्भुत संयोग; ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकेल नशीब! पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ?
Till 7th March Shukra Gochar In Makar Rashi To Give Chance of Becoming Crorepati Love Relations Of Husband Wife Will Change Astrology
‘धनाचा दाता’ ग्रह मकर राशीत प्रवेश करून ७ मार्चपर्यंत ‘या राशींना देईल करोडपती बनण्याची संधी, प्रेमही बहरेल

मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

कामाचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विनाकारण अडचणी सामोर्‍या येऊ शकतात.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

भावंडांशी मैत्रीचे नाते ठेवा. व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मनोबल वाढीस लागेल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

जुनी येणी वसूल होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. भावनिक निर्णय घेऊ नका.

सिंह (Leo Horoscope Today ):-

प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत काळ व्यतीत कराल. अपचनाचा त्रास संभवतो. मानसिक शांतता राखावी.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

प्रखर मत नोंदवताना काळजी घ्या. गैरसमज होऊ देऊ नका. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. संयम व धैर्य राखावे. कामाची योग्य आखणी करावी.

तूळ (Libra Horoscope Today ):-

लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा. कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा. बोलण्यातून मान कमवाल. मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. वडीलधार्‍यांचे सल्ले ऐकावेत. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. वाणी संयमित ठेवा. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरासाठी काही खरेदी कराल. कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत. कौटुंबिक वातावरण तप्त राहील.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

कौटुंबिक कामाचा भार उचलावा. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस अनुकूल असेल. थोडीफार धावपळ संभवते. जागेच्या व्यवहारात गाफिल राहू नका.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस. कौटुंबिक शांतता जपावी. क्षुल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका. वाहनाचे काम निघू शकते.

मीन (Pisces Horoscope Today ):-

व्यवसायिकांनी संधी ओळखावी. आजचा दिवस अनुकूल असेल. कामाची व्याप्ती वाढेल. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. प्रवास सत्कारणी लावाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 18 october 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 18-10-2022 at 01:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×