आजचं राशीभविष्य, मंगळवार, १९ ऑक्टोबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींना मुलाखतीत यश येईल. भावंडांची इच्छा जाणून घ्या..

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

मनाची चंचलता जाणवेल. अतीविचार करू नका. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कार्यक्षेत्रात मान मिळवाल. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल.

वृषभ:-

कामे मनाप्रमाणे मार्गी लावाल. जमिनीचे व्यवहार कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा. अधिकारी वर्ग सकारात्मक बातमी देतील.

मिथुन:-

इतरांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल. नवीन कामे हाती येतील. कौटुंबिक सदस्यांशी मतभेद संभवतात. बौद्धिक कसोटी लागू शकते.

कर्क:-

लहान प्रवास कराल. वडीलधार्‍यांना विरोध करू नका. जुने ठरवलेली कामे पूर्ण कराल. विरोधकांच्या कारवाया मावळतील. हस्तकलेत चिकाटी बाळगा.

सिंह:- 

मानसिकरित्या खंबीर रहा. तूर्तास धाडसी निर्णय नकोत. कुटुंबासाठी काही खरेदी कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन विचार तत्काल अंमलात आणावा.

कन्या:-

किरकोळ गोष्टींमुळे मनस्ताप वाढू शकतो. तडजोडीला पर्याय नाही. कामात एकाग्रता ठेवा. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. मित्रांना मदत कराल.

तूळ:-

अघळपघळ शब्द वापरू नका. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. तुमच्या बुद्धिकौशल्यावर लोक खुश होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लहान भावंडांना मदत कराल.

वृश्चिक:-

मुलांबरोबर वेळ घालवाल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते. दिवसाची सुरवात मेहनतीत जाईल. फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल.

धनू:-

नातेवाईकांच्या गाठी पडतील. कौटुंबिक कामाने थकून जाल. तरुण वर्गाकडून काही नवीन शिकायला मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

मकर:-

मुलाखतीत यश येईल. भावंडांची इच्छा जाणून घ्या. कामात उत्साह जाणवेल. दिवसभराच्या कामाचे चिंतन करा. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

कुंभ:-

योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर द्या. क्षुल्लक गैरसमजूत वाद वाढवू शकते. चर्चेतून नवीन कल्पना सुचतील. मानसिक चलबिचलता वाढवू नका. भावंडांची मदत घ्यावी.

मीन:-

घाई-घाईने कामे करू नयेत. नियोजनावर अधिक भर द्यावा. सासुरवाडीचे लोक मदत करतील. अनावश्यक खर्चाला आळा घालावा. नवीन कामाची रूपरेषा आखावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 19 october 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr