मेष:-

सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?

वृषभ:-

उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.

मिथुन:-

वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कामात काही बदल अचानक घडून येतील. प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.

कर्क:-

स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. प्रफुल्लता, स्फूर्ती यांचा काहीसा अभाव राहील. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्व द्याल. अनावश्यक खर्च केला जाईल. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.

सिंह:-

कौटुंबिक बाबीत गैरसमजाची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या. तरुणांचे विचार जाणून घ्या.

कन्या:-

रेस, जुगारापासून दूर राहावे. कामात स्त्रियांची मदत मिळेल. स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलण्याने निर्धारित कामे पूर्ण कराल. नाहक खर्च होण्याची शक्यता.

तूळ:-

कामासंदर्भात आज सतर्क राहावे लागेल. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. व्यावसायिक शत्रूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेऊ नका. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

वृश्चिक:-

बरेच दिवस अडकून पडलेले प्रश्न सुटू लागतील. गुंतवणूक वाढवावी लागेल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. नवीन धोरण समोर ठेवावे लागेल. संपर्कातून लाभ होऊ शकतो.

धनू:-

मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. चिकाटी अधिक वाढवावी लागेल. घरातील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. सरळ मार्गाचा अवलंब करावा. समोर येणारे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा.

मकर:-

परिश्रम घेणे सोडू नका. कामे जिद्दीने पार पाडावीत. उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा नवीन विचार आमलात आणा. समोरील उपयुक्त गोष्टींचा वापर करावा.

कुंभ:-

रखडलेल्या कामांना गती येईल. अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील. मनाची चलबिचलता कमी होईल. थोडा उत्साह वाढवावा लागेल. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

मीन:-

मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. अति घाई उपयोगाची नाही. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. क्रोधाला आवर घालावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर