आजचं राशीभविष्य, गुरूवार , २ सप्टेंबर २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार राशीच्या मिथुन राशीचे व्यक्ती दिवस मनाप्रमाणे घालवतील. घरात आनंदी वातावरण असेल.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

विनाकारण आक्रमकता दाखवू नका.  नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण  कराल. मेहनत फळाला येईल.

वृषभ:-

बोलण्यात गोडवा ठेवाल. घरगुती जबाबदारी वाढू शकते. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा. व्यावसायिक निर्णय फलद्रुप होताना दिसतील.

मिथुन:-

दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. हातातील अधिकार ठामपणे बजावा. भाग्याची चांगली साथ मिळेल.

कर्क:-

दिवसाची सुरुवात छान होईल. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील. आळस दूर सारावा.

सिंह:-

आपले स्वत्व राखून वागाल. मुलांबरोबर चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. वेळेचा सदुपयोग करा.

कन्या:-

बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे संकेत.

तूळ:-

दिवसाची सुरुवात उत्साहात करा. छोटे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरातील ज्येष्ठांची संवादात्मक चर्चा करावी.

वृश्चिक:-

बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवा. आर्थिक व्यवहार सर्व बाबी तपासून करावेत. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

धनू:-

जुन्या विचारांना थारा देऊ नका. बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करा.

मकर:-

कामातून समाधान लाभेल. तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकार्‍यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. जुने वाद मिटण्याची शक्यता.

कुंभ:-

उतावीळपणे वागू नका. हातातील कामे यशस्वी होतील. जुगारातून धनलाभ संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे. संशोधन पुढे नेण्यास उत्तम काळ.

मीन:-

बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा. लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. जुनी गुंतवणूक कामी येईल. जोडीदाराचे व्यावहारिक चातुर्य दिसेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 2 september 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr