आजचं राशीभविष्य, शनिवार, २० नोव्हेंबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींच्या घरामध्ये शांतता नांदेल. दिवस आनंदात जाईल.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

बोलताना आपला मुद्दा स्पष्ट मांडा. रचनात्मक कार्याची चुणूक दाखवा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. प्रेम सौख्यात वाढ होईल. घरगुती  वातावरण आनंदी असेल.

वृषभ:-

आपले मानसिक आरोग्य बिघडवू नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. स्थावर मालमत्तेतून लाभ संभवतो. दिवस आपल्या आवडी प्रमाणे घालवा. कुटुंबातील सदस्य चांगल्या बातम्या देतील.

मिथुन:-

खेळ व कला यांमध्ये वर्चस्व राहील. अनपेक्षित खर्च सामोरी येतील. मानसिक सौख्याला प्राधान्य द्या. व्यापारी वर्गाने भागीदारीकडे अधिक लक्ष द्यावे. पित्त प्रकृतीत वाढ संभवते.

कर्क:-

आपले हितचिंतक पारखून घ्या. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रलंबित येणी वसूल होऊ शकतील. काही परिवर्तन सकारात्मक ठरतील. घरात टापटीप ठेवाल.

सिंह:-

आपली स्वप्ने सत्यात उतरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. त्या प्रमाणे केलेली कृती समाधान देईल. कामे मनाजोगी पार पडतील.

कन्या:-

घरामध्ये शांतता नांदेल. दिवस आनंदात जाईल. अधिक ऊर्जा व उत्साहाने कामे कराल. कामातील बदल आनंद देईल. मन प्रसन्न राहील.

तूळ:-

आपल्या स्वत:साठी काही खर्च कराल. हितशत्रूकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक आरोग्य जपावे. खर्चाचा ताळमेळ साधावा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

वृश्चिक:-

आपल्याच मतावर अडून राहाल. चारचौघांत कौतुक होईल. आवडत्या व्यक्तीची साथ मिळेल. तुमचा रूबाब वाढेल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल.

धनू:-

आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. मोहाला बळी पाडू नका. कामातून आनंद शोधाल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर:-

जिद्द व चिकाटी सोडू नका. जुगारात धनलाभ संभवतो. विवाहाचे प्रस्ताव पुढे येतील. व्यापारातील नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये कामाकडेच पूर्ण लक्ष द्या.

कुंभ:-

खरेदीचे निर्णय लांबणीवर टाकाल. व्यवहारात गल्लत करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. घरातील वातावरण सकारात्मक असेल. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च कराल.

मीन:-

प्रलंबित येणी मिळतील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त प्रवास घडेल. व्यापारात नवीन धोरण ठरवाल. ध्येयाचा पाठलाग करा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 20 november 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या