आजचं राशीभविष्य, बुधवार, २० ऑक्टोबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यापार्‍यांना नवीन दिशा सापडेल. मनातील साशंकता काढून टाका.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

मानसिक अस्वस्थतेत वाढ होऊ शकते. स्वत:साठी काही वेळ काढावा. सकारात्मक गोष्टी आठवून पहा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

वृषभ:-

घरातील कामात व्यस्त राहाल. जमिनीची कामे सुरळीत पार पडतील. संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते. कष्टाला पर्याय नाही.

मिथुन:-

अनेक दिवस भिजत पडलेले प्रश्न मार्गी लागतील. हातातील वेळेचा सदुपयोग करा. व्यापारी वर्गाला नवीन करार लाभदायक ठरतील. रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल. कार्यालयीन ठिकाणी मतभेद टाळावेत.

कर्क:-

काटकसरीवर लक्ष द्या. हातातील कलेला वेळ द्यावा. घरात लोकांची उठ बस राहील. वडीलधार्‍यांचे मत ग्राह्य मानावे लागेल. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मोलाची ठरेल.

सिंह:-

बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका. कौटुंबिक सौख्य जपावे. आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा. व्यापारी वर्गाने संधी सोडू नये. कुटुंबातील सदस्यांबरोबर विचार विनिमय करावा.

कन्या:-

घरातील वातावरण उत्साही ठेवा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल. भागीदाराशी मतभेद संभवतात.

तूळ:-

आपल्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक दाखवाल. विद्यार्थ्यानी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. बौद्धिक कौशल्य दाखवावे लागेल.

वृश्चिक:-

एकांतात काही काळ घालवावा. काही गोष्टींचे मनन चिंतन करावे. मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल. भागीदारीतून लाभ शक्य होईल. झोपेची तक्रार जाणवेल.

धनू:-

जुने ग्रंथ वाचनात येतील. आध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन होऊन जाल. तरुण वर्गाच्या सहवासात रमाल. महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

मकर:-

तुमच्या मताला मान मिळेल. पत्नीच्या सहकार्याने कामे कराल. मदतीचा आनंद मिळवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी.

कुंभ:-

व्यापार्‍यांना नवीन दिशा सापडेल. मनातील साशंकता काढून टाका. प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल. बोलताना संभ्रमीत होऊ नका. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल.

मीन:-

मुलांशी वाद संभवतात. जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल. हातातील चांगली संधी सोडू नका. भागीदारीत फार विसंबून राहू नका. उगाचच चीड -चीड करू नये.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 20 october 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या