आजचं राशीभविष्य, बुधवार, २१ जुलै २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये.

Horoscope Today Daily Horoscope Rashi Bhavishya in Marathi
सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

मानसिक ताण जाणवेल. अति विचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील.

वृषभ:-

गैरसमजाला मनात थारा देऊ नका. खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा. मित्रांशी मतभेदाची शक्यता.

मिथुन:-

मन:शांती  मिळवण्याचा प्रयत्न कराल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

कर्क:-

मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.

सिंह:-

कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

कन्या:-

महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ:-

भावनिक अस्थिरता जाणवेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.

वृश्चिक:-

भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. मुलांचे विचार स्व‍च्छंदी वाटतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदाराचे विचार जाणून घ्याल.

धनू:-

नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका. चर्चेतून मार्ग काढावा. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे.

मकर:-

शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी.

कुंभ:-

भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका. शिस्तीचा फार बडगा करू नका.

मीन:-

चांगल्या संधीच्या शोधत रहा. सकारात्मक उर्जेने कामे कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 21 july 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news