scorecardresearch

आजचं राशीभविष्य, शनिवार, २३ एप्रिल २०२२

आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे.

मेष:-

दिवसभर कामाची धावपळ राहील. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. काही अडचणीतून  मार्ग काढता येईल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घरगुती वातावरण चांगले राहील.

वृषभ:-

वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. गुरुकृपेचा लाभ उठवावा. तीर्थयात्रेचे योग येतील. दिवस खेळीमेळीत घालवाल.

मिथुन:-

मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे. लबाड लोकांची संगत टाळावी. गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.

कर्क:-

जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाची चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा. अती भावनाविवश होऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. लहानांच्यात लहान होऊन वावराल.

सिंह:-

पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कलेला पोषक वातावरण मिळेल. गोड बोलून फायदा साधून घ्याल. कमिशनमधून चांगली कमाई होईल.

कन्या:-

मुलांना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करावा. मतभेदाला खतपाणी घालू नका. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

तूळ:-

मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. क्रोधाला बळी पडू नका. कौटुंबिक नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

वृश्चिक:-

प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. पत्नीचे मत विरोधी वाटेल. भावंडांचे प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक सहलीचा विचार करावा.

धनू:-

कौटुंबिक खर्च वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. मत्सराला बळी पडू नका. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.

मकर:-

नवीन विचारांची कास धरावी. तिखट व तामसी पदार्थ आवडीने खाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. घरात तुमचा दबदबा राहील. करमणुकीच्या कार्यक्रमात गुंग व्हाल.

कुंभ:-

शांत व संयमी विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मनाची चंचलता दूर करावी. धार्मिक स्थळांना भेट द्याल. आध्यात्मिक बळ वाढवावे.

मीन:-

प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्त्रियांमुळे मतभेद संभवतात. अती चौकसपणा दर्शवू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 23 april 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या