आजचं राशीभविष्य, मंगळवार, २३ नोव्हेंबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामात जोडीदाराची मदत घ्याल.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

त्रासदायक गोष्टींपासून दूर रहा. राग अनावर होऊ शकतो. मन अस्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळावा. दिवसाची सुरुवात दमदार होईल.

वृषभ:-

अनेक बाजूंनी लाभदायक दिवस. कष्टाचे फळ मिळेल. तुमचा आनंद द्विगुणित होईल. संयम सोडून वागू नका. जुन्या मित्रांची गाठ पडेल.

मिथुन:-

कामाचा भार वाढेल. त्यामुळे थकवा जाणवेल. कष्टाचे फळ थोड्या अवधीने मिळेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आनंदी वृत्ती ठेवावी.

कर्क:-

भाग्याची उत्तम साथ मिळेल. कमी नवीन कामे अंगावर पडतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईक मदतीला येतील. नवीन विचार जाणून घेता येतील.

सिंह:-

चिडचिड वाढू शकते. शांततेचे धोरण ठेवावे. अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ जखम संभवते.

कन्या:-

जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. स्वभावात उधळेपणा येईल. वस्तूंची गरज लक्षात घेऊन खरेदी करावी. चोरांपासून सावध राहावे. उगाचच कोणाचा राग मनात धरून ठेऊ नका.

तूळ:-

तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे. फार त्रास करून घेऊ नका. समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. चिडचिड करू नका.

वृश्चिक:-

स्त्रीवर्गापासून सावध राहावे. पायाचे त्रास जाणवतील. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांची उत्तम साथ मिळेल.

धनू:-

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामात जोडीदाराची मदत घ्याल. मुलांच्या मनात आदर निर्माण होईल. संतती सौख्य उत्तम लाभेल. हाताखालील लोकांशी नीट वागावे.

मकर:-

योजनेला मूर्त स्वरूप द्यावे. हातातील कामात चिकाटी ठेवा. आळस झटकून काम करावे लागेल. वडीलधार्‍यांची सेवा कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल.

कुंभ:-

घर आणि काम यांचा मेल घालावा. नातेवाईकांना नाराज करू नका. तुमच्यातील हुशारी दिसून येईल. कुटुंबात मन रमेल. प्रवास त्रासदायक ठरू शकतात.

मीन:-

खर्चाला आवर घालावी. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. मनात उगाचच भलत्या शंका आणू नका. हातातील कामाला प्राधान्य द्यावे. ध्यानधारणा करावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 23 november 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr