Rashi Bhavishya 24 january 2026 In Marathi : आज २४ जानेवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्टी तिथी असणार आहे. त्याचबरोबर शिव योग जुळून येईल आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते ११ वाजून १३ मिनिटांपर्यंत असेल. तर शनिवारी तुमच्या आयुष्यात काय घडणार चला पाहुयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, २४ जानेवारी २०२६ (Dainik Rashi Bhavishya In Marathi 24 january 2026 )

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. घरातील वातावरण आनंदी असेल. घर खर्चाचा पुनर्विचार कराल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

स्वत:च्या जबाबदारीवर कामे हाती घ्याल. पराक्रमाला वाव आहे. नवीन उलाढाली कराल. सर्व गोष्टींची अनुकुलता लाभेल. दिवस मनासारखा जाईल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

दानधर्म कराल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. सार्वजनिक कामात मदत कराल. खर्चाचे नवीन गणित मांडावे. आर्थिक आवक चांगली राहील.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

मित्रमंडळींच्या सहवासात दिवस घालवाल. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे. तुमची इच्छा पूर्ण होईल. स्त्रीवर्गाच्या मदतीने कामे पार पडतील. जवळचे मित्र भेटतील.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

धरसोडपणा करून चालणार नाही. सारासार विचार करून निर्णय घ्यावेत. काळजी करण्याचे कारण नाही. कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका.व्यावसायिक लाभ अपेक्षेनुसार राहील.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

उत्कृष्ट आर्थिक फायदा संभवतो. आर्थिक कोंडी मिटेल. अडचणीवर मात करता येईल. गुरुकृपेचा लाभ होईल. मदत केल्याचे समाधान लाभेल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

काही कामे वेळ काढतील. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. वडिलांची नाराजी दूर करावी. मैत्रीतील गैरसमज दूर करावेत. अचानक धनलाभाची शक्यता.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

पत्नीच्या सुशीलपणाचे कौतुक कराल. भागादाराची उत्तम साथ मिळेल. एकमेकांबद्दलची प्रेमळ ओढ वाढेल. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. भागीदारीत चांगला फायदा संभवतो.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

आरोग्याची काळजी घ्यावी. कामातून समाधान लाभेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. हाताखालील मंडळींची चांगली साथ लाभेल. आत्मविश्वास बाळगावा.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. नाटक, सिनेमा पाहण्याचे कार्यक्रम आखाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. कामात चलाखी दाखवाल. बुद्धीकौशल्याने कामे कराल.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

घरातील वातावरणात रमून जाल. मानसिक सौख्य लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. वादाचे प्रसंग उकरून काढू नका. इतरांचा विश्वास संपादन करावा.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

ज्ञानात भर पडेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्याल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडातील प्रेमळपणा वाढेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर