आजचं राशीभविष्य, शनिवार, २४ जुलै २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्ती सामाजिक भान राखून वागतील. आरोग्यात सुधारणा होईल.

Horoscope Today Daily Horoscope Rashi Bhavishya in Marathi
सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

सामाजिक भान राखून वागाल. आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ:-

परनिंदा चांगली नाही. वाहन जपून चालवा. व्यवहारात पारदर्शकता हवी.  घरातील जबाबदारी पार पाडाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल.

मिथुन:-

समोरच्या व्यक्तिला जाणून घ्या. आर्थिक गणित जमेल. अगोचरपणा करून चालणार नाही. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल.

कर्क:-

अविश्वास दाखवू नका. अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका. साहस करताना सारासार विचार करावा. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे.

सिंह:-

मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वादाच्या मुद्यात जिंकाल. दिवस अनुकूल जाईल. हाताखालील लोकांचे सहकारी मिळेल.

कन्या:-

काही चांगल्या बातम्या कानावर येईल. अधिकारी वर्ग खुश राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल. जुनी कामे मार्गी लागतील.  अतिजोखीम पत्करू नका.

तूळ:-

नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. उधारी चुकती कराल. मानसिक चिंता वाढू शकते.

वृश्चिक:-

झालेली चूक कबुल करावी लागेल. अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लादू नका. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

धनू:-

ठाम निर्णय घ्यावेत. अति भावनाविवश होऊ नका. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठाशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल.

मकर:-

नसत्या फंदात पडू नका.  कामे संथ गतीने पार पडतील. कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल.

कुंभ:-

भावनेला आवर घालावी लागेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी.

मीन:-

मौलिक सल्ला घ्यावा लागेल. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 24 july 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी