मेष:-

संमिश्र फळे मिळतील. मनातील बदलांकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. हेतु मनात धरून कामे कराल. महिलांनी शांत राहावे.

वृषभ:-

समोरील संधी सोडू नका. स्वत:चा फायदा लक्षात घेऊन वागाल. नवीन विचारांनी त्रस्त राहाल. ठोस निर्णयाची गरज आहे. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.

मिथुन:-

दिवसाची सुरुवात प्रफुल्लित होईल. स्थिर चित्ताने कामे सुरू करावीत. सुंदर वस्त्रे परिधान कराल. मनातील नकारात्मक विचार दूर सारा. आवडती व्यक्ति भेटेल.

कर्क:-

मानसिक अस्वस्थता जाणवेल. अंतिम निर्णयाला पोहोचायला वेळ लागेल. संबंधितांचे गैरसमज होऊ शकतात. वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह:-

दिवस चांगला जाईल. मनाची द्विधावस्था टाळावी. नवीन कार्य हाती घेताना संपूर्ण विचार करावा. सहलीचा बेत आखाल. धनलाभ संभवतो.

कन्या:-

दिवस शुभ आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून फायदा होईल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील. कामासाठी बाहेर गावी जावे लागू शकते. सरकारी कामात अधिक वेळ जाईल.

तूळ:-

बौद्धिक कामात व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. दूरचा प्रवास संभवतो. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मुलांविषयी चिंता लागून राहील.

वृश्चिक:-

दिवस सावधानतेने घालवावा. रागावर नियंत्रण ठेवावे. अनैतिक कृत्ये करू नयेत. नामस्मरणाने लाभ होईल. राजकीय खेळ खेळू नका.

धनू:-

दिवस समाधानात जाईल. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. राजकीय गोष्टींपासून दूर राहावे. प्रवासाचा बेत आखाल. आपली आवड जोपासाल.

मकर:-

व्यापारात वाढ होईल. मनाजोगी कमाई करता येईल. आज वैचारिक बदल दिसून येईल. सहकारी मदत करतील. आवश्यक ठिकाणीच खर्च कराल.

कुंभ:-

नवीन कामाची सुरुवात करू शकता. मत परिवर्तन होण्याची शक्यता आहे. महिलांनी सबुरीने वागावे. मुलांविषयी चिंता लागून राहील. पोटाच्या तक्रारी राहतील.

मीन:-

नावडत्या घटनांनी निराश होऊ नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. मनाची मरगळ दूर सारावी. वाहन जपून चालवावे. कागदपत्रे जपून ठेवावीत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर