Today Rashi Bhavishya, 24 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल. मुलांबाबतची चिंता दूर होईल. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. वृषभ (Taurus Horoscope Today ):- मनाची चलबिचलता जाणवेल. विचार भरकटू देऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल. वादाचे मुद्दे टाळावेत. गुंतवणूक करताना जोखीम पत्करू नये. वृषभ (Taurus Horoscope Today ):- अकारण खर्च टाळावा. संमिश्र घटनांचा दिवस. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वातावरण लक्षात घेऊन काम करावे. अडकलेले धन प्राप्त होण्याची शक्यता. कर्क (Cancer Horoscope Today ):- कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. नवीन व्यवसायास गती मिळेल. तुमचा मान वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस. सिंह (Leo Horoscope Today ):- चोख हिशोब ठेवावा. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल. मान, सन्मानात वाढ होईल. दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कन्या (Virgo Horoscope Today ):- लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. कामाचा ताण जाणवू शकतो. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा. तूळ (Libra Horoscope Today ):- स्वत:च्या सुखासाठी पैसा खर्च कराल. प्रतिपक्षावर मात कराल. धनलाभाचे योग जुळून येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. परिस्थितीचा ताळमेळ साधाल. वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):- कौटुंबिक ताणतणाव टाळावेत. मित्रांशी जवळीक साधाल. मुलांची चिंता लागून राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्यांची गाठ पडेल. धनू (Sagittarius Horoscope Today ):- पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. जिभेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल. आहाराची पथ्ये पाळावीत. मिळकतीचा नवीन स्त्रोत सापडेल. मकर (Capricorn Horoscope Today ):- जुन्या विचारांना मनातून काढून टाका. भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी. व्यापारी वर्गाने सबुरीने घ्यावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. कुंभ (Aquarius Horoscope Today ):- मानसिक स्वास्थ्य ढळू देऊ नका. सट्टा, जुगारापासून दूर रहा. नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. विनाकारण प्रवास घडेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत. मीन (Pisces Horoscope Today ):- प्रतिस्पर्ध्याबरोबर हुशारीने वागावे. पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी. मानसिक ताण घेऊ नये. कार्य व अधिकार वाढतील. कौशल्याचा वापर करावा लागेल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर