Aajche Rashi Bhavishya 25 February 2026 In Marathi : आज २५ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी असणार आहे. त्याचबरोबर विष्कंभ योग जुळून येईल आणि रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ४ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. बुधवारी तुमचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, २५ फेब्रुवारी २०२६ (Daily Horoscope 25 February 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
धार्मिक कामात हातभार लावाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. नावलौकिकास पात्र व्हाल. दानाचे महत्व पटवून द्याल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
प्रवासात सतर्क राहावे. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. मनात उगाचच भीती दाटून येईल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. उगाचच विरोध करणे टाळावे. वैवाहिक सुख-शांती जपावी. मोठ्या लोकात वावराल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
पोटाचे त्रास संभवतात. फार तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
स्वत:चा हेका गाजवाल. मैदानी खेळ खेळाल. आपले ज्ञान उपयोगात आणावे. चर्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
कौटुंबिक समस्या शांततेने सोडवावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल. वाहन सावधगिरीने चालवावे.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
मानसिक संवेदनशीलता दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे. मनात काहीशी भीती लागून राहील. नवीन विषय जाणून घ्यावेत. चलाखीने वागणे ठेवाल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
घरगुती प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शाब्दिक चकमक टाळावी.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
मानसिक चलबिचलता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे. परिस्थितीला नावे ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
शांत व संयमी विचार करावा. लोकनिंदेला बळी पडू नका. जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
मित्रांशी मतभेद संभवतात. कसलाही वाद वाढू देवू नका. बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल. वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
कामाचा व्याप लक्षात घ्यावा. स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा. वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा. कागदपत्रे तपासून घ्यावीत.

