मेष:-

आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खाल.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
What should be carefully considered while taking a car loan
Money Mantra: वाहन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं ?
transgender gets death sentence
साडी-चोळी दिली नाही, सूड भावनेतून तीन महिन्यांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून; तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा

वृषभ:-

वाणी सौम्य ठेवून वागाल. मैत्रीपूर्ण संबंध जपावेत. कामातून मान-प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ संभवतो.

मिथुन:-

स्थावरचे व्यवहार सुसह्य होतील. कागदपत्रांवर सही करतांना सावधानता बाळगावी. भागीदारीच्या कामात सक्रिय व्हाल. नवीन संबंधातून क्षणिक सुख मिळेल. स्वत: विषयक चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.   

कर्क:-

जोडीदाराशी विसंवादाची शक्यता. तुमच्यातील अधीरता वाढेल. आपले विचार जवळच्यावर लादण्याचा प्रयत्न कराल. मनाजोगी खरेदी कराल. वरिष्ठांना खुश ठेवावे.

सिंह:-

घरातील सुख सोयींकडे विशेष लक्ष द्याल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने वागावे. आभ्यासू लोकांचा सहवास लाभेल. नवीन विचार जाणून घ्याल.

कन्या:-

फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील. गृहसौख्याला अधिक महत्व द्यावे. मतभिन्नता दर्शवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अपचनाचा त्रास जाणवेल.

तूळ:-

दूरस्थ व्यावसायिक कामात गती येईल. जवळचा प्रवास घडेल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचे त्रास संभवतात. तिखट व तामसी पदार्थ खाल.

वृश्चिक:-

कोणतेही साहस करतांना सावधानता बाळगावी. हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सतावतील. नातेवाईकांना नाराज करू नका. भागिदारीतून लाभ उठवाल.

धनू:-

जमिनीच्या कामात गती येईल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. समर्पक भावना दर्शवावी लागेल. वैचारिक दृष्टीकोन बदलून पहावा.

मकर:-

सहकार्‍यांची वेळेवर मदत मिळेल. कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल. मनातील संभ्रम दूर सारावा. व्यावसायिक कामात अधिक वेळ द्यावा लागेल.

कुंभ:-

नवीन आव्हाने जाणून घ्यावीत. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलाल. बाग कामात मन रमेल. अनावश्यक खर्च टाळावा.

मीन:-

इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. सारासार विचारांवर भर द्यावा. स्वतंत्र विचारांची कास धराल. काही कामे अधिक कस पाहतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर