मेष:-

कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

वृषभ:-

कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील.

मिथुन:-

जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा.

कर्क:-

अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्‍यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता.

सिंह:-

सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल . जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

कन्या:-

जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल.

तूळ:-

स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा.

वृश्चिक:-

वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांती जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका.

धनू:-

भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

मकर:-

काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो.

कुंभ:-

क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा.

मीन:-

बदल लक्षात घेऊन  वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर