आजचं राशीभविष्य, गुरूवार, २५ नोव्हेंबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींच्या हातातील कामात यश येईल. वाहन विषयक काम पूर्ण होईल.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

दिवस संमिश्र जाईल. अधिकार्‍यांशी सबुरीने वागावे. वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक मान मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

वृषभ:-

अधिक व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.  नवीन कामात यश मिळेल. सरकारी नोकरांनी स्पष्टता बाळगावी. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

मिथुन:-

दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. काही अनपेक्षित लाभ मिळतील. मित्रांच्या मदतीने प्रश्न सोडवता येतील. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनुभव हाच गुरु हे लक्षात घ्या.

कर्क:-

स्वत:मध्येच रमून जाल. प्रतिस्पर्ध्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीतील बदलाला अनुकूल काळ. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

सिंह:-

विरोधकांच्या युक्त्या लक्षात घ्या. प्रेम जीवनात जवळीक साधता येईल. अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करू नका. मेहनतीने यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्याने नवीन संधी मिळेल.

कन्या:-

कामात तत्परता दाखवा. कौटुंबिक आनंद साधता येईल. मित्रांची मदत घ्याल. रखडलेली सरकारी कामे पुढे सरकतील. घराची समस्या सोडवली जाईल.

तूळ:-

श्रेणीत वाढ संभवते. दूरची प्रवासाचा योग पुढे ढकलला जाऊ शकतो. घराचे काम निघेल. इतर कामात अधिक वेळ जाईल. मुलांच्या प्रगतीने मन सुखावेल.

वृश्चिक:-

काही विशेष करण्याच्या नादात वेळ खर्ची जाईल. वरिष्ठांशी चांगला संबंध निर्माण होईल. व्यावसायिक सौदा मनाजोगा होईल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

धनू:-

अडकलेले पैसे मिळतील. अध्यात्मावरील विश्वास वाढेल.  नवीन संकल्पामुळे कामांना गती मिळेल. निर्णय फायदेशीर ठरतील. एखादी भेट वस्तु मिळेल.

मकर:-

वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराला वेळ दिल्याने नाते अधिक मजबूत होईल. हितशत्रू नरमाईची भूमिका घेतील. पाहुण्यांचे घरी आगमन होईल.

कुंभ:-

हातातील कामात यश येईल. वाहन विषयक काम पूर्ण होईल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तु खरेदी कराल. नवे संकल्प कराल.

मीन:-

मुलांचे प्रश्न सोडवाल. आर्थिक बाबतीत वडीलांचे सहकारी लाभेल. हवामान बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमिकांचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 25 november 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या