आजचं राशीभविष्य, बुधवार, २८ जुलै २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींची आध्यात्मिक प्रगती होईल. झोपेची थोडीफार तक्रार जाणवेल.

Horoscope Today Daily Horoscope Rashi Bhavishya in Marathi
सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

कौटुंबिक सलोखा राहील. आहारावर नियंत्रण हवे. विलासी जीवनाची अनुभूति घ्याल. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृषभ:-

कामाचा आवाका वाढेल. जोडीदाराची मोलाची साथ मिळेल. आळस झटकून कामे करावीत. मित्रांचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनातील गोडी वाढेल.

मिथुन:-

धरसोडपणा टाळून निर्णय घ्यावा. महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या. चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवा. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल.

कर्क:-

नियोजित कामे बरगळू शकतात. नवीन संधीच्या शोधात राहाल. वरिष्ठांना खुश करावे लागेल. लपवाछपवीची कामे करू नका. नवीन ओळख लाभदायक ठरेल.

सिंह:-

आध्यात्मिक प्रगती होईल. झोपेची थोडीफार तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. दिवस मनोरंजनात घालवाल. काही महत्त्वाच्या वस्तु खरेदी कराल.

कन्या:-

कौटुंबिक नातेसंबंध जपाल. योजनाबद्ध कामे सफल होतील. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. आर्थिक स्तर सुधारेल.

तूळ:-

प्रिय व्यक्ती सोबत नातेसंबंध सुधारतील. आवडत्या कामात वेळ जाईल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल.

वृश्चिक:-

हातचे राखून बोलाल. वाढीव जबाबदारी अंगावर घ्याल. मन काहीसे विचलीत राहील. कौटुंबिक समस्या जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनू:-

परिस्थितीतून शांततेने मार्ग काढाल. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबत दक्ष राहावे. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

मकर:-

तडजोडीला पर्याय नाही. समोरील परिस्थितीचा स्वीकार करावा. अति भावनाशील होऊ नका. मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे. कौटुंबिक कामात मन रमवा.

कुंभ:-

मानसिक ताण घेऊ नका. बोलताना इतरांचे मन दुखवू नका. वादाच्या प्रसंगांपासून दूर रहा. ज्येष्ठ बंधुंची मदत होईल. अनुभवाचा उपयोग करून घ्यावा.

मीन:-

नवे निर्णय घ्यायला सवड मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. दिवस उत्साहात जाईल. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Horoscope today 28 july 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr