scorecardresearch

आजचं राशीभविष्य, मंगळवार २८ जून २०२२

आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य ०८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

कामाच्या स्वरुपात काहीसे बदल करायला हरकत नाही. नवीन ओळख बनवता येईल. गैरसमजुतीचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. सामुदायिक वादात लक्ष घालू नका.

वृषभ:-

काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. सतत खटपट करत राहाल. जवळच्या व्यक्तींच्या सहवासाची ओढ वाढेल. सर्वांशी जुळवून घ्यावे लागेल. आवडत्या गोष्टीत रमून जाल.

मिथुन:-

कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील. उत्तम कार्यशक्ती लाभेल. दर्जा जपण्यासाठी धडपड कराल. ईर्षेने परिस्थितीवर मात कराल. संघर्षमय स्थितीपासून लांब राहावे.

कर्क:-

उपासनेत अधिक वेळ घालवावा. गैरसमजातून होणारी कटुता टाळा. आपले मत इतरांवर लादू नका. नियमित व्यायामावर भर द्यावा. शांत विचार करण्याची गरज भासेल.

सिंह:-

व्यक्तिमत्व विकासावर भर द्या. अंगीभूत कलागुणांचा विकास करता येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल.

कन्या:-

सामाजिक दर्जा सुधारता येईल. तुमचे अस्तित्व इतरांना दाखवून द्याल. अधिकार वाढीसाठी प्रयत्न कराल. महत्त्वाची सरकारी कामे पुढे सरकतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.

तूळ:-

आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल. मान टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. राजकारणी धोरण आजमावून पहाल. आत्मबळाने वाटचाल करावी. पित्त विकाराचा त्रास जाणवेल.

वृश्चिक:-

काही कामे उगाचच वेळ घेतील. क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी लागेल. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. आत्मचिंतन करावे लागेल.

धनू:-

जोडीदाराशी बोलताना मतभिन्नता वाढू शकते. त्याच्या मानी स्वभावाचा अचंबा वाटेल. नवीन लोक संपर्कात येतील. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागावे लागेल. घरगुती कामात गुंतून पडाल.

मकर:-

कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक गोष्टीत कौटुंबिक सहकार्य घ्यावे. मनातील इच्छेला मुरड घालून पहावी. अधिकारांचा योग्य ठिकाणी वापर करावा. कामाचा उरक वाढवावा लागेल.

कुंभ:-

बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेत प्रगती करता येईल. स्पर्धेत भाग घ्याल. एककल्ली विचार करू नका. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.

मीन:-

मन:शांति जपावी लागेल. फार चिडचिड करू नका. काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.  शांत व संयमी विचार करावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 28 june 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या