Aajche Rashi Bhavishya 28 March 2026 In Marathi : आज २८ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. त्याचबरोबर सुकर्मा योग जुळून येईल आणि पुष्य नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर मेष ते मीनचे शनिवारचे राशिभविष्य जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, २८ मार्च २०२६ (Horoscope Today 28 March 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक सौख्य चांगले राहील. बोलण्यातून इतरांवर छाप पडाल. गायन कलेला चांगला दर्जा मिळेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
वैवाहिक सौख्यात भर पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. नटण्या मुरडण्याची हौस भागवाल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब दिवस मजेत घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. वाचनाची आवड पूर्ण कराल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
स्त्रियांशी मैत्री वाढेल. नवीन गोष्टींचे आकर्षण वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. मनातील रुक्षपणा काढून टाकावा.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
इतरांवर तुमची छाप पडेल. चंचलतेवर मात करावी. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो. जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
आवडते ग्रंथ गोळा कराल. धार्मिक कामात सहकार्य कराल. आधिभौतिक गोष्टींकडे कल राहील. शैक्षणिक कामे पूर्ण होतील. काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
नातेवाईकांची मदत घेता येईल. कामे वेगात पूर्ण करता येतील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. फसवणुकीपासून सावध राहा.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. गरज असेल तरच प्रवास करा. व्यवसाय वृद्धीचा विचार करा. भावंडांचे प्रश्न समोर येतील. हातून एखादे सत्कार्य घडेल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
मनाची संवेदना दाखवाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. जुन्या कामातून फायदा संभवतो.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. उगाचच चीड-चीड करू नये.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
मनातील निराशा बाजूस सारावी. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका. ध्यानधारणेत वेळ घालवाल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
कामात उगाचच अडकून पडल्यासारखे वाटेल. लबाड लोकांपासून दूर राहा. अती काळजी करू नका. सार्वजनिक कामात मदत कराल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.
