मेष:-

आनंदी  भावना वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहकार्य कराल. व्यवसायात नवीन बादल होतील. त्याचा नंतर फायदा मिळेल. आरोग्य बाबत जागरूक रहा.

| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?
Rahu And Shukra Conjunction
होळीनंतर राहू-शुक्रची होणार युती! या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येईल आनंद, धनलाभासह मिळेल नव्या नोकरीची संधी

वृषभ:-

कामात क्षुल्लक अडचणी येतील. नोकरवर्गा कडे लक्ष ठेवा. कौटुंबिक बाबतीत चालढकल करू नका. शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा.

मिथुन:-

जुनी कामे पूर्ण होतील. नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो. वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. घाई घाईने निर्णय घेऊ नका.

कर्क:-

अध्यात्माविषयी ओढ वाढेल. भौतिक सुखसोयी वाढतील. विवेक बुद्धीने कामे करा. इतरांच्या उणिवा काढू नका. अभिमान वाढू शकतो.

सिंह:-  

मौल्यवान गोष्टी पासून लाभ होईल. गरीबांना मदत कराल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्य क्षमतेत वाढा होईल. अध्यात्मात रस घ्याल.

कन्या:-

तुमचा प्रभाव वाढेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल.  अनावश्यक खर्चा सामोरे येतील. मनाला येईल तसे वागाल.. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ:-

मेहनतीमुळे तब्येत नरम राहील. चार चौघात संयमाने वागाल.. कुटुंबाकडून चांगली बातमी  मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील.

वृश्चिक:-

आजचा दिवस संमिश्र आहे. पोटाच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील. त्यामुळे मन खट्टू होईल. मंगल कार्यालयात सहभाग घ्याल.

धनू:-

सामाजिक उपक्रमात वेळ घालवाल. भौतिक गोष्टीत फार अडकू नका. मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा. आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील.

मकर:-

स्वत:चे निर्णय क्षमता वापरा. सामाजिक वादात अडकू नका. खर्च फायदेशीर ठरेल. परोपकाराची भावना जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कुंभा:-

नवीन संकल्प कराल. आध्यात्मिक आवड जोपासाल. घरात तुमच्या आमचे कौतुक होईल. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासाल.

मीन:-

नसत्या चिंता करू नका. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल. नातेवाईकांची गाठ पडेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर