आजचं राशीभविष्य, गुरूवार, २९ जुलै २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींची खूप दिवसांनी जवळच्या मित्राची गाठ पडेल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल.

Horoscope Today Daily Horoscope Rashi Bhavishya in Marathi
सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाढेल. मन काहीसे विचलीत राहील. आत्मविश्वास कायम ठेवावा. सामाजिक भान राखून वागाल.

वृषभ:-

व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळावा. उत्साहवर्धक घटना घडतील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल.

मिथुन:-

कामाची धांदल वाढू शकते. काही अनपेक्षित बदल संभवतात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल. जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल. अनावश्यक खर्च टाळावा.

कर्क:-

मुलांशी मतभेद संभवतात. व्यावसायिक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळावी लागेल. आळस बाजूला सारून कार्यमग्न रहा. आवडते पुस्तक वाचाल.

सिंह:-

धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. सकारात्मकतेने वावराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातापायास किरकोळ इजा संभवते. नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.

कन्या:-

खूप दिवसांनी जवळच्या मित्राची गाठ पडेल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल. तरुणांचे विचार जाणून घ्याल. कलाकारांना काही तरी नवीन करण्याची संधी मिळेल. केलेली धावपळ लाभदायक ठरेल.

तूळ:-

रागावर अंकुश ठेवावा. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल. मन काहीसे विचलीत राहील. कामाच्या ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागू शकते.

वृश्चिक:-

सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या ताणाचा परिणाम जाणवेल. जुने वाद मिटवावेत.

धनू:-

प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर कराल. दिवस काहीसा अनुकूल राहील. रखडलेली कामे मार्गी लावाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. बौद्धिक चकमक टाळावी.

मकर:-

कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. भावंडांची मदत मिळेल. मनावरील दडपण कमी होईल. घरात अधिकारवाणीने वावराल. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल.

कुंभ:-

अडचणीतून मार्ग काढता येईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. महिला वर्ग करमणुकीत रमेल. विरोधकांवर मात करता येईल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते.

मीन:-

कटू बोलणे टाळा. एकतर्फी विचार करू नका. हितशत्रू पासून सावध रहा. उधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Horoscope today 29 july 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr