scorecardresearch

Premium

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २९ सप्टेंबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या.

Astro new
आजचे राशीभविष्य १९ डिसेंंबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 29 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

Sanjay Raut on Manipu mention Narendra Modi
“मणिपूरची परिस्थिती भयंकर, विद्यार्थ्यांना गोळ्या झाडून…”; मोदींचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…
school
प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने शिक्षिकेकडून विचित्र शिक्षा, विद्यार्थी नैराश्येत गेल्यानंतर प्रकरण उजेडात!
Rajiv Gandhi Student Accident Relief Grant Scheme provide financial assistance students case death permanent disability
शासकीय योजना: विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान
Office Boss And Home Duties Make You Angry Causing High Blood Pressure Ladies Check If You Have PCOS Signs Who is at Risk
ऑफिसमध्ये बॉस व घरी काम, सतत वाढतोय रक्तदाब? तुमच्या चिडचिडीमागे ‘हा’ आजार तर नाहीये ना कारण, वाचा

काही प्रश्न मार्गी लावाल. मुलांच्या बाबत चिंता लागून राहील. सामाजिक वादात पडू नका. दिवसभर धावपळ करावी लागेल. गरजूंना मदत केल्याचा आनंद मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

कुटुंबासोबत दिवस मजेत घालवाल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल. वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू स्थिरावेल. कामातील अडचणी दूर करू शकाल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

जोडीदाराकडून लाभ होईल. आवडती वस्तु बरेच दिवसांनी सापडेल. आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. व्यापारात नवीन भागीदार सापडेल. अनेक जबाबदार्‍या पार पाडाल.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य  आणावे. त्यामुळे मार्ग सहज सापडेल. कुटुंबासाठी खर्च कराल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

मित्रांकडून अनपेक्षित लाभ संभवतात. सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. सहकार्‍यांशी वादात पडू नका. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

कामातील बदल लक्षात घ्या. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील.

तूळ (Libra Horoscope Today ):-

कामानिमित्त छोटे प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान,सन्मान वाढीस लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. विरोधक पराभूत होतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

आरोग्याची वेळच्यावेळी काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. तुमचा उद्देश साध्य होईल. सारासार विचार करून घेतलेला निर्णय योग्य ठरेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील. द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला. वैचारिक दिशा बदलून पहा. भावंडांची मदत घ्याल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही. कामात झालेले नुकसान भरून काढाल. नवीन योजना आखताना सावधानता बाळगा.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

विद्यार्थ्यांना उत्तम काळ. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. नातेसंबंध दृढ होतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

मीन (Pisces Horoscope Today ):-

घरासंबंधी कामे मार्गी लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. ज्ञान वाढीस लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 29 september 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 29-09-2022 at 01:10 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×