scorecardresearch

Premium

आजचं राशीभविष्य, शनिवार, ३० एप्रिल २०२२

आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी संपूर्ण विचारांती शब्द द्यावा. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. दिवस मनाप्रमाणे घालवावा. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. गोड बोलून कामे साध्य करावीत.

Daily Horoscope 8 october 2023
Daily Horoscope: जोडीदाराच्या आनंदासाठी खर्च करणार ‘या’ राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य
Daily Horoscope 2 october 2023
Daily Horoscope: आठवड्याच्या पहिल्या दिवशी ‘या’ राशीच्या व्यक्तींना जोडीदाराचा सहवास लाभणार, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 30 September 2023
Daily Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ राशीच्या व्यापाऱ्यांना होणार लाभ, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 24 September 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रणे ठेवावे; जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

वृषभ:-

मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल. सारासार विचार करण्यावर अधिक भर द्याल. उगाच चिडचिड करू नका. काम आणि वेळ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा.

मिथुन:-

स्वत:ची आब राखून वागावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कर्क:-

घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला. मनातील निराशा झटकून टाकावी. कामे यथायोग्य पार पडतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल.

सिंह:-

इतरांना आनंदाने मदत कराल. पारमार्थिक कामात सहभागी व्हाल. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. कामातील किरकोळ अडचणी दूर करता येतील. भागीदाराशी सामंजस्य ठेवावे.

कन्या:-

अपचनाचा त्रास जाणवेल. हलका आहार घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. कामात हयगय करू नका. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा.

तूळ:-

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोक वेळेवर भेटतील. क्षुल्लक कारणाने चिडू नका. अचानक धनलाभ संभवतो. योग्य वेळेचा लाभ उठवावा.

वृश्चिक:-

कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. चर्चेने काही प्रश्न हाताळावेत. सबुरी व संयम दोन्ही जपावा लागेल. कामात मन रमवावे लागेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

धनू:-

आवडते खेळ खेळाल. मित्रांशी पैज लावाल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल.

मकर:-

संपूर्ण विचारांती शब्द द्यावा. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. विचारांची दिशा बदलून पहावी.

कुंभ:-

नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका. कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसन्न फार मनावर घेऊ नका.

मीन:-

आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. हस्त कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 30 april 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 30-04-2022 at 01:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×