Rashi Bhavishya 30 April 2026 In Marathi : आज ३० एप्रिल २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी रात्री ९ वाजून १३ मिनिटांपर्यंत असणार आहे, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरु होईल. आज रवी योग जुळून येईल आणि रात्री १२ वाजून १६ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून १ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ २ वाजून १२वाजता सुरु होईल ते ३ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ३० एप्रिल २०२६ (Dainik Rashi Bhavishya 30 April 2026 In Marthi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

धार्मिक कामात सहभाग घ्याल. मदतीचा हात पुढे कराल. योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

वायफळ बडबड टाळावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे. कामातील बादल लक्षात घ्या. कलेचा आस्वाद घ्याल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

जोडीदारा विषयी गैरसमज टाळावेत. भागीदारीत सतर्क राहावे. तब्येतीची हेळसांड करू नये. आपली संगत तपासून पहावी. एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

तरुण लोकांशी मैत्री कराल. दिवस खोडकरपणात घालवाल. सहकार्‍यांवर अवलंबून राहू नका. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदाराशी वाद वाढवू नका. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

मनाची द्विधावस्था जाणवेल. घरच्या कामाचा ताण जाणवेल. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक ताणाला बळी पडू नका. मुलांचा विरोध समजून घ्यावा.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य वाढेल. क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

मैत्रीतील आपुलकी वाढेल. फसवणुकीपासून सावध राहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक लाभाचा दिवस.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. धाडसाने कामे हाती घ्याल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. अती घाई बरी नाही.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कर्तव्यात कसूर करू नका. हातून चांगले लिखाण होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर