मेष:-

आज तुमचा प्रभाव वाढीस लागेल. तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. स्थावर विषयक कामे होतील. वाहन खरेदीचे काम पुढे सरकेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल.  

Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?

वृषभ:-

कामे निर्भयपणे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला जाईल. व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. खर्च नियंत्रणात ठेवा.

मिथुन:-

तुमच्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते. औपचारिकतेत अडकून राहू नका. अडकलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांनी संयम राखावा. एकाग्रतेने कामे करावीत.

कर्क:-

भावंडांची नाराजी सहन करावी लागेल. निसर्गाबद्दल दक्षता बाळगा. इतरांना आनंदात सहभागी करून घ्याल. भौतिक गोष्टींवर खर्च कराल. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.

सिंह:-

परमार्थाची भावना वाढीस लागेल. आत्मविश्वासाच्या बळावर कामे कराल. जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाचा दबाव वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

कन्या:-

आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल. वाणीवर संयम ठेवा.

तूळ:-

नवीन गोष्टीबद्दल आवड वाढेल. तुमचे शब्द खरे ठरतील. नवीन कामासाठी मार्ग मोकळा होईल. जुन्या मित्रांची गाठ पडेल. जुन्या आठवणी जागवल्या जातील.

वृश्चिक:-

आज कमाईपेक्षा जास्त खर्च कराल. मुलांकडून मनाजोगी कामे पार पडतील. कौटुंबिक कामे सुरळीत पार पडतील.  छुपे शत्रू माघार घेतील. आवडत्या व्यक्तीची गाठ पडेल.

धनू:-

ज्ञानात भर पडेल. मेहनतीने इच्छा पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. तूर्तास गुंतवणूक टाळा. धार्मिक कामात मन रमेल.

मकर:-

वारसा हक्काचे काम होईल. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा माराल. चोरांपासून सावध राहावे. जीवनसाथीची मनाजोगी साथ मिळेल.

कुंभ:-

आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या क्षेत्रात यश मिळेल. उत्पन्न वाढीस लागेल. उत्तम मार्गदर्शन लाभेल. कोणालाही कर्ज देणे टाळावे.

मीन:-

ईश्वराप्रती श्रद्धा बाळगा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. व्यावसायिक कामासाठी प्रवास केला जाईल जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जुना आजार त्रास देऊ शकतो.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर