Today Rashi Bhavishya, 31 July 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
Sankashti Chaturthi 2024
Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशी होतील मालामाल; गणपतीच्या कृपेने होणार धनसंपत्तीत वाढ

दिवस मनाप्रमाणे घालवाल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

मित्रांची बाजू जाणून घ्यावी. मानसिक चंचलता जाणवेल. समतोल विचार करून पहावा. जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

मोहाला बळी पडू नका. जोडीदाराविषयी मनात शंका बाळगू नका. गोड बोलून कामे करून घ्यावीत. मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

आज आशादायक ग्रहमान राहील. कामाचा जास्त बोजा घेऊ नका. वरिष्ठांची कौतुकाची थाप पडेल. दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. रेस-जुगारातून लाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

अति उत्साहावर नियंत्रण ठेवा. भागीदाराशी सुयोग्य चर्चा कराल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधकांचा रोष मावळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

आज आराम करण्याची इच्छा निर्माण होईल. प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कामातून समाधान लाभेल. नसती काळजी करू नका.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

दिवस प्रसन्नतेत उगवेल. काही  जुने प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

व्यायामात आळस करू नका. घरातील वातावरण खेळते राहील. दिवस मजेत जाईल. जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. भावंडांची मदत मिळेल. कोणालाही दुरूत्तर करू नका. मानसिक चंचलता टाळावी. प्रेमसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा.

मीन (Pisces Horoscope Today ):-

नवीन संकल्पना कृतीत उतरवा. कौटुंबिक कामात वेळ जाईल. बागकामाची आवड जोपासाल. उतावीळपणा करू नये. मित्र मंडळींचे सहकार्य घ्याल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर