Horoscope Today 4 November 2026 : आज ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. उद्या ब्रम्ह योग आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्र जुळून येईल. आज अभिजात मुहूर्त ११ वाजून ४२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल आणि राहू काळ १२ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे. मेष ते मीन राशींचा बुधवार कसा जाणार जाणून घेऊ.
आजचे पंचांग व राशिभविष्य, ४ नोव्हेंबर २०२६ (Rashi bhavishya 4 November 2026)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जुगारातून लाभ संभवतो.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका.
