scorecardresearch

आजचं राशीभविष्य, मंगळवार ५ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींचे आर्थिक प्रश्न सुटतील. मात्र त्याबरोबर खर्च देखील वाढेल.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. प्रिय व्यक्तिला भेटवस्तू द्याल. गरजेच्या कामात अधिक वेळ घालवा. आपल्या आवडत्या गोष्टी कराव्यात. नातेवाईकांकडून आनंद वार्ता मिळेल.

वृषभ:-

मनात आशेचा नवीन किरण उठेल. आर्थिक बाबतीत घरच्यांचा सल्ला मिळेल. जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल. आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल. मनात उगाचच नसती काळजी उत्पन्न होऊ देऊ नका.

मिथुन:-

आर्थिक प्रश्न सुटतील. मात्र त्याबरोबर खर्च देखील वाढेल. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. उदासवाणी मनस्थिती दूर करता येईल. काही प्रश्न चर्चेतून सुटू शकतील.

कर्क:-

आर्थिक बाबतीत आपण सतर्क राहाल. कामाची घाई-गडबड राहील. त्यामुळे अधिक वेगाने कामे पूर्ण करावी लागतील. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. मानसिक स्थिरता जपावी.

सिंह:-

अपेक्षित असा व्यावसायिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. आरोग्यात सुधारणा संभवते. मानसिक समाधान लाभेल. कालगुणांना वाव द्यावा.

कन्या:-

तडजोडीला पर्याय नाही हे ध्यानात घ्यावे. मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करावा. अति विचार करणे योग्य नाही. प्रगल्भ विचार करण्याची गरज भासेल. द्विधा मनस्थिती बाहेर पडावे लागेल.

तूळ:-

क्षुल्लक गोष्टीवर अडून राहू नका. संपर्कातील लोकांची मदत मिळेल. ओळखीतून कामे होण्याची शक्यता. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. अपयशाने खचून जाऊ नका.

वृश्चिक:-

हातातील कामात मनाजोगे यश येईल. सहकारी तुम्हाला वेळेवर मदत करतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. अपेक्षित लाभाने खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

धनू:-

कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढाल. मुलांबरोबर खेळीमेळीने वागाल. आपला आनंद आपणच शोधावा. जुन्या गोष्टी फार मनावर घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद वाढवू नका.

मकर:-

साहसाने कामात हात घाला. प्रवास जपून करावा. नवीन उद्दीष्ट सावधपणे हाताळा. अकारण आलेली निराशा झटकून टाका. कौटुंबिक कामात मन रमेल.

कुंभ:-

वादाचे मुद्दे फार ताणू नका. आर्थिक बाबतीत अतिशय सतर्क राहावे. योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

मीन:-

मानसिक उत्साह वाढेल. आज कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. अधिक जोमाने कामे कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 5 july 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या