Dainik Horoscope Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope Live 5 July 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ५ जुलै २०२५:

19:12 (IST) 5 Jul 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

मानसिक उत्साह वाढेल. आज कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. अधिक जोमाने कामे कराल.

19:11 (IST) 5 Jul 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

वादाचे मुद्दे फार ताणू नका. आर्थिक बाबतीत अतिशय सतर्क राहावे. योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

19:11 (IST) 5 Jul 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

साहसाने कामात हात घाला. प्रवास जपून करावा. नवीन उद्दीष्ट सावधपणे हाताळा. अकारण आलेली निराशा झटकून टाका. कौटुंबिक कामात मन रमेल.

18:18 (IST) 5 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढाल. मुलांबरोबर खेळीमेळीने वागाल. आपला आनंद आपणच शोधावा. जुन्या गोष्टी फार मनावर घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद वाढवू नका.

18:08 (IST) 5 Jul 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

क्षुल्लक गोष्टीवर अडून राहू नका. संपर्कातील लोकांची मदत मिळेल. ओळखीतून कामे होण्याची शक्यता. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. अपयशाने खचून जाऊ नका.

18:07 (IST) 5 Jul 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

तडजोडीला पर्याय नाही हे ध्यानात घ्यावे. मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करावा. अति विचार करणे योग्य नाही. प्रगल्भ विचार करण्याची गरज भासेल. द्विधा मनस्थिती बाहेर पडावे लागेल.

16:07 (IST) 5 Jul 2025

७२ वर्षानंतर श्रावण महिन्यात दुर्मिळ योग, एकाच वेळी ४ ग्रह होतील वक्री, ३ राशींच्या नशीब चमकणार

वैदिक कॅलेंडरनुसार, वार्षिक सावन महिना २५ जुलैपासून सुरू होईल. भगवान शिव यांना समर्पित महिन्यात, ग्रहासाठी एक अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण होईल. खरं तर, सूर्याच्या मध्यभागी असलेले चार ग्रह एकत्रितपणे वक्री होतील. म्हणजेच चार ग्रह विरुद्ध दिशेने जातील. ज्योतिष्य शास्त्रानुसार," ७२ वर्षांनी हा योग जुळून आला आहे." ...सविस्तर बातमी
15:47 (IST) 5 Jul 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

अपेक्षित असा व्यावसायिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. आरोग्यात सुधारणा संभवते. मानसिक समाधान लाभेल. कालगुणांना वाव द्यावा.

15:13 (IST) 5 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

आर्थिक बाबतीत आपण सतर्क राहाल. कामाची घाई-गडबड राहील. त्यामुळे अधिक वेगाने कामे पूर्ण करावी लागतील. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. मानसिक स्थिरता जपावी.

12:41 (IST) 5 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

आर्थिक प्रश्न सुटतील. मात्र त्याबरोबर खर्च देखील वाढेल. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. उदासवाणी मनस्थिती दूर करता येईल. काही प्रश्न चर्चेतून सुटू शकतील.

12:05 (IST) 5 Jul 2025

Ashadi Ekadashi 2025: उद्या आषाढी एकादशीचा पावन दिवस; जाणून घ्या एकादशी तिथीची सुरुवात, पुजेचा शुभ मुहूर्त व पारण वेळ

Ashadi Ekadashi 2025 date Shubh Muhurat: या एकादशीला 'देवशयनी एकादशी', असेदेखील म्हटले जाते. असं म्हणतात की, एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. ...सविस्तर बातमी
12:03 (IST) 5 Jul 2025

आषाढी एकादशीचा दिवस 'या' तीन राशींना देणार बँक बॅलन्समध्ये घसघसशीत वाढ; विठ्ठलाच्या आशीर्वादाने मिळणार पैसा, प्रेम अन् पदोपदी यश

Devshayani Ekadashi 2025: या दिवशी गुरू आदित्य राजयोग तसेच साध्य योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योगदेखील निर्माण होत आहे. या शुभ संयोगाच्या प्रभावाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल. ...सविस्तर बातमी
11:18 (IST) 5 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

मनात आशेचा नवीन किरण उठेल. आर्थिक बाबतीत घरच्यांचा सल्ला मिळेल. जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल. आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल. मनात उगाचच नसती काळजी उत्पन्न होऊ देऊ नका.

11:02 (IST) 5 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. प्रिय व्यक्तिला भेटवस्तू द्याल. गरजेच्या कामात अधिक वेळ घालवा. आपल्या आवडत्या गोष्टी कराव्यात. नातेवाईकांकडून आनंद वार्ता मिळेल.

10:03 (IST) 5 Jul 2025

शुक्राच्या नक्षत्र गोचरामुळे ५ राशींचे नशीब पलटणार! नोकरीत प्रगती होणार अन् व्यवसायातून मिळणार पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार, सुख, संपत्ती आणि पर्यायी गणितीय घटक बदल ग्रह शुक्र नक्षत्र आहे. शुक्राच्या या नक्षत्रात कोणत्या ५ राशीच्या लोकांना फायदा होईल. ...अधिक वाचा
09:43 (IST) 5 Jul 2025

उद्या देवशयनी एकादशीपासून ‘या’ राशींच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? शनीचा शुभ योग नशीबाचे बंद दरवाजे उघडणार, मिळणार पैसा!

Tri Ekadash Yog 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनी हे कर्म व न्याय देवता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या कर्मानुरूप फळ देणारे शनी हे कलियुगातील दंडाधिकारी आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार, शनी सध्या मीन राशीत विराजमान असून जून २०२७ पर्यंत तिथेच राहणार आहेत. याच दरम्यान ६ जुलै रोजी येणाऱ्या देवशयनी एकादशीच्या दिवशी शनी आणि शुक्र एका विशेष ‘लाभ दृष्टि’ मध्ये येणार आहेत. सविस्तर वाचा

09:14 (IST) 5 Jul 2025

६ जुलैपासून ‘या’ तीन राशींना अचानक धनलाभ होणार, सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने पदोपदी यश मिळणार

Sun Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. सविस्तर वाचा

09:02 (IST) 5 Jul 2025

पैसाच पैसा! १०० वर्षानंतर पितृपक्षात लागणार चंद्र अन् सूर्य ग्रहण! ‘या’ ३ राशींचे नशीब चमकणार; करिअर व्यवसायात घेणार मोठी झेप

Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात पितृ पक्षाचा विशेष महत्व आहे. श्राद्ध पक्षाचे प्रत्येक वर्ष १५ दिवसांचा काळ असतो आणि या दिवसांमध्ये तुमच्या पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करण्याचे पद्धत आहे. भद्रपदाची पूर्णिमा तारीख सुरू होणारा पितृ पक्ष अश्विन महिन्यातील अमावस्येला समाप्त होईल. या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये ७ तारखेपासून २१ तारखेपर्यंत हा काळ असणार आहे. सविस्तर वाचा

08:12 (IST) 5 Jul 2025
Horoscope Today: स्वाती नक्षत्रात नव्याने बहरणार आयुष्य; कोणाला जोडीदाराचा साथ तर कोणाच्या मनात येईल आशेचा नवीन किरण; वाचा राशिभविष्य

Horoscope Today In Marathi, 5 July 2025: ५ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी संध्याकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल. रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १०:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर आज स्वाती नक्षत्र तुमच्यासाठी काय घेऊन येणार हे जाणून घेऊया… सविस्तर वाचा

Horoscope Today in Marathi Live 5 July 2025:

आजचे राशीभविष्य, ५ जुलै २०२५ लाईव्ह (सौजन्य - फ्रिपीक)