मेष:-

आवडी निवडीबद्दल दक्ष राहाल. कामाचा अतिरिक्त तान जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने  पहावे. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल.

Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

वृषभ:-

लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मनापासून  रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

मिथुन:-

कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे तळाल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील.

कर्क:-

तुमची समाजप्रियता वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रा परिवारात वाढ होईल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.

सिंह:-

तुमच्या कलेला योग्य प्रशस्ती मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची मने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल.

कन्या:-

धार्मिक वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल. हातून एखादे सत्कार्य घडेल.

तूळ:-

कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल. शेअर्समधून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.

वृश्चिक:-

वैवाहिक सौख्यात भर पडेल. तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.

धनू:-

नातेवाईकांची मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. दिवस काहीसा आळसात जाईल. ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. काटकसरी कडे लक्ष द्या.

मकर:-

रागावर नियंत्रण ठेवावे. रेस जुगार यांतून लाभ संभवतो. मैत्रीतील घनिष्टता  वाढेल. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.

कुंभ:-

हातात नवीन अधिकार येतील. जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवस आनंदात जाईल. जवळचे मित्र भेटतील.

मीन:-

निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. हस्त कलेचा आनंद घ्याल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर