scorecardresearch

आजचं राशीभविष्य, बुधवार ६ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्ती आपल्या इच्छेला अधिक महत्त्व देतील. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल.

Daily Horoscope in Marathi, Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशीभविष्य १३ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

मेष:-

कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. परक्या व्यक्तींपासून दूर राहावे. या आधीचा कामातील अनुभव उपयोगी पडेल. सरकारी कर्मचार्‍यानी दुविधा टाळावी.  जवळचे मित्र भेटतील.

वृषभ:-

आवश्यकता असेल तरच बोलावे. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. दिवस मजेत जाईल. गोडीगुलाबीने कार्य साधाल.

मिथुन:-

कामाच्या स्वरुपाचे नवीन मार्ग शोधावेत. क्षणिक मोहात पडाल. स्वत:वर खर्च कराल. आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होईल. मनात नसती शंका आणू नका.

कर्क:-

आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील. व्यवसायातून चांगली कमाई होईल. पुढील गरजांसाठी आत्ताच खर्च कराल.

सिंह:-

व्यावसायिक कामातून चांगला लाभ मिळवाल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. दिवस आनंदात जाईल. नवीन विचार जोपासले जातील.

कन्या:-

धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. ग्रह बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या समोरील व्यावसायिक संधी ओळखा. त्यातून तुमची सकारात्मकता वाढेल. पत्नीशी वाद वाढवू नका.

तूळ:-

अचानक धनलाभाची शक्यता. कमी श्रमातून कामे साध्य करता येतील. रेस, जुगार यातून कमाई कराल. जुनी देणी भागवता येतील. योग्य गुंतवणूक करू शकाल.

वृश्चिक:-

व्यावसायिक अनुकूलता लाभेल. मित्रांच्या ओळखीतून लाभ होईल. प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांशी परिचय वाढवता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.

धनू:-

मानसिक शांतता लाभेल. त्यातून नवीन विचारांना चालना देता येईल. तुमच्यातील कल्पकतेला वाव देण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोकांकडून कामे सुरळीत पार पडतील. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील.

मकर:-

अधिक चपळाईने कामे करता येतील. कलेचा मनमुराद आस्वाद घ्याल. उगाचच येणारा आळस टाळावा लागेल. ऐनवेळी होणारी गडबड टाळावी. कामाचा योग्य आराखडा तयार ठेवावा.

कुंभ:-

घरात टापटीप ठेवाल. घरातील काही कामे स्वत:हून अंगावर घ्याल. दिवस आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार घालवाल. नवीन ओळखी करून घ्याव्यात. भडक शब्द वापरणे टाळा.

मीन:-

केलेल्या निश्चयानुसार वागावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. जुने मित्र गोळा कराल. कामासाठी काही वेगळे पर्याय शोधावेत. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 6 july 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr