Aajche Rashi Bhavishya 8 April 2026 In Marathi : आज ८ एप्रिल २०२६ रोजी चैत्र कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी ७ वाजून १ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर सप्तमी तिथी सुरु होईल. त्याचबरोबर दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत वरियन योग जुळून येईल आणि रात्री २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ८ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. बुधवारी तुमच्या राशीच्या आयुष्यात काय घडणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ८ एप्रिल २०२६ (Dainik Rashi Bhavishya 8 April 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
अती श्रमाचा थकवा जाणवेल. खोट्याचा आधार घेऊ नका. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवा. आपल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. नवीन कामांना गती येईल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
सामाजिक कार्यात मदत नोंदवाल. दिवस घरी गडबडीत जाईल. घरगुती कामासाठी प्रवास कराल. आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. कष्टाला पर्याय नाही.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यावा. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. पत्नीची प्रेमळ साथ लाभेल. क्षणिक सौख्याने खुश व्हाल. सामाजिक कामात सहभाग नोंदवाल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक चंचलता जाणवेल. मनात नवीन इच्छा जागृत होईल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. लेखन कार्य चांगल्या प्रकारे करता येईल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
कामानिमित्त प्रवास घडेल. सहकार्यांवर तुमचा दबदबा राहील. मान सन्मानास पात्र व्हाल. कलेला भरभरून दाद मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
क्षुल्लक गोष्टींचा ताण घेऊ नका. आपले मानसिक स्वास्थ्य आपणच जपावे. कामात द्विधावस्था आड आणू नये. जोडीदाराचे मत विचारात घ्या. परोपकाराची जाणीव ठेवावी.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचे बेत आखाल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
घरगुती वातावरण प्रसन्न असेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कामाचा व्याप वाढता राहील. नवीन व्यावसायिक योजना अमलात आणाव्यात. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
ताण मुक्तीसाठी ध्यानधारणा करावी. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मुलांचे भरभरून कौतुक कराल. कामातून उत्तम समाधान लाभेल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कौटुंबिक विचारास प्राधान्य द्याल. योग्य अंदाज बांधता येईल. सर्व गोष्टी चौकसपणे विचारात घ्याल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. आपले मत उत्तम रित्या मांडाल. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने नवीन कामे हाती घ्याल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
नवीन गोष्टींमध्ये उत्सुकतेने रस घ्याल. कामात तत्परता दिसून येईल. कौटुंबिक जबाबदारी यशस्वी रित्या पार पडाल. हातून एखादे सत्कार्य घडून येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी.
