Rashi Bhavishya 9 July 2026 In Marathi : आज ९ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील नवमी तिथी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल आणि मग दशमी तिथी सुरु होईल. आज अश्विनी नक्षत्र जुळून येईल, त्याचबरोबर सुकर्मा व धृती योग एकाच दिवशी जुळून येत आहेत. राहू काळ २ वाजून २३ मिनिटांनी सुरु होईल ते ४ वाजून ०२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त १२ वाजून १७ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. गुरुवारी कोणत्या रूपात होणार तुमच्यावर स्वामीकृपा जाणून घ्या…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ७ जुलै २०२६ ( Dainik Rashi Bhavishya 9 July 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

मानसिक व्यग्रता जाणवेल. अति विचार करू नका. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नका. नसत्या वादात लक्ष घालू नका. फसवणुकीपासून सावध राहावे.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

वेळेचे बंधन पाळावे लागेल. घाई गडबडीत कामे उरकू नका. कौटुंबिक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा होतील. सर्वांशी प्रेमाने संवाद साधाल. लोक तुमच्या स्वभावाकडे आकृष्ट होतील.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

मनात विचारांचा गोंधळ उडेल. ठामपणे निर्णय घेण्यासाठी मदतीची गरज भासेल. अनाठायी खर्च केला जाईल. मानसिक द्विधावस्थेतून बाहेर यावे लागेल. कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

लहानशा अपयशाने खचून जाऊ नका. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. मानभंगाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. कामात चिकाटी आणावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

जवळचे मित्र भेटतील. कामात त्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली जाईल. तुमच्यातील अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

अधिकारी मंडळींच्या सल्ल्याने वागावे. दूरच्या कामातून लाभ संभवतो. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ संभवतो. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. बोलक्या व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

सरकारी कामात अधिक काळ गुंतून पडाल. मोठ्या , प्रतिष्ठित लोकांच्यात ऊठबस राहील. नवीन विचारांनी भारावून जाल. नवीन संधीची कामना कराल. अचानक धनलाभाची शक्यता.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. पत्नीच्या मताप्रमाणे जावे लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. त्यांना मदतीचा हात पुढे कराल. हातातील कामाला गती मिळेल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

मनात अनामिक चिंता निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सहकारी तुम्हाला अपेक्षित मदत करतील. कामगारांकडून कामे सुरळीत पार पडतील. भुलथापांना भुलून जाऊ नका.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सुस्वभावी लोकांच्यात वावराल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस आनंदात जाईल. करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्याल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल. हित शत्रूंवर मात करता येईल. तुमच्या यशाने विरोधक शांत होतील. केलेल्या कामाची चोख पावती मिळेल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्रासाला कारण ठरू शकते. तुमचे कौशल्य पणाला लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर