scorecardresearch

Premium

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ९ सप्टेंबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आळस झटकून कामाला लागावे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा.

Astro new
आजचे राशीभविष्य १९ डिसेंंबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 9 September 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

Daily Horoscope 7 october 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या कामातून होणार फायदा, पाहा १२ राशींचे भविष्य
Daily Horoscope 6 october 2023
Daily Horoscope: कोणत्या राशीच्या लोकांनी फसवणूकीपासून सावध राहावे? पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 24 September 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रणे ठेवावे; जाणून घ्या १२ राशींचे भविष्य
Daily Horoscoper 13 September 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराशी वाद करणे टाळावे, पाहा तुमचे भविष्य

प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल. नवीन व्यावसायिक हालचाली सुरू होतील. मेहनत फळाला येताना दिसेल. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

आहाराची पथ्ये पाळा. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी. हातातील कलेला वाव द्यावा. कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. दिवसाची सुरवात चांगली होईल. बुद्धी कौशल्याने कामे मार्गी लावावीत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

घरात वातावरण आनंदी राहील. प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. खर्च वाढते राहतील.

सिंह (Leo Horoscope Today ):-

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. घाई करू नये. व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत. येणी वसूल होतील.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

हातातील कामे पूर्ण करावीत. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समस्येतून मार्ग निघेल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करा. स्त्री सहकार्‍यांची मदत मिळेल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

मनासारखी गोष्ट घडेल. हवी असलेली वस्तु सापडेल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू राहील. स्थावर मालमत्तेतून लाभाची शक्यता.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

आळस झटकून कामाला लागावे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. विचार भरकटू देऊ नका. समोरील संधीचे सोने करावे.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

दिवस समाधानाचा जाईल. कटू शब्द टाळा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यापारातील लाभ शांतता प्रदान करतील. नवनवीन खर्च उद्भवतील.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

दिवस धावपळीत जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. प्रलोभनांना बळी पडू नये. वडीलांची मदत घेऊन कामे होतील. मान, सन्मान वाढेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे. एखादी आनंदी बातमी समजेल. मात्र खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

दिवस मंगलदायी ठरेल. मोठ्या माणसांच्या गाठी पडतील. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. चर्चा करताना संयम बाळगावा. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 9 september 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

First published on: 09-09-2022 at 01:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×