काही जणांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो. मंगळ दोषामुळे विशेषतः लग्नकार्यात अडथळे येतात, असे मानले जाते. जर पती-पत्नीपैकी कुणाला मंगळ दोष असेल तर दुसऱ्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हा दोष लग्नापूर्वी सुधारला जाऊ शकतो, याासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार मंगळ कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीच्या चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल तर मंगळ खूप प्रभावी असतो. यामुळे कुंडलीत मंगल दोष निर्माण होतो. याशिवाय जेव्हा मंगळ राशीच्या आठव्या भावात असेल तेव्हा त्याचा प्रभाव खूप वाढतो.

ज्योतिषांच्या मते, मुलाच्या कुंडलीतील मंगल दोष काही साध्या उपायांनी दूर केला जातो. कधीकधी मुलाच्या वयाच्या २८ वर्षानंतरही मंगळ दोष असाच दूर होतो. याउलट हा दोष मुलीच्या कुंडलीत असल्यास त्याचा प्रभाव दीर्घकाळ दिसून येतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचे लग्न झाले तर तिचे वैवाहिक जीवनात अडचणी येतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

16th April Panchang rashi bhavishya these zodiac signs Wishes will be fulfilled Aries to Min signs Daily marathi horoscope
१६ एप्रिल पंचांग: इच्छा होतील पूर्ण, हातात येतील नवीन अधिकार; वाचा मेष ते मीन राशींचा कसा असेल मंगळवार ?
15th April Panchang rashi bhavishya Family happiness to sudden wealth gain zodiac signs For marathi horoscope
१५ एप्रिल पंचांग: कौटुंबिक सौख्य ते अचानक धनलाभ; मेष ते मीन ‘या’ राशींच्या आयुष्यात आज नवं काय घडणार?
mars gochar 2024 mangal transit in pisces these zodiac sign get more profit
१८ महिन्यांनंतर मंगळ मीन राशीत करणार प्रवेश, ‘या’ राशींना अच्छे दिन; धनसंपत्तीत होऊ शकते भरभराट
Surya Shani Yuti
शनि-सूर्यदेवाची युती संपल्याने ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

मांगलिक दोष अशा प्रकारे दूर होतो

  • शुभ ग्रहांच्या केंद्रस्थानी असल्‍याने, शुक्र दुस-या घरात असल्‍याने, गुरु मंगळासोबत असल्‍याने किंवा मंगळावर गुरूची दृष्टी असल्‍यामुळे मंगळ दोष ग्राह्य होत नाही.
  • वधू किंवा वराच्या मांगलिक स्थानात मंगळ असेल आणि सूर्य, शनि, राहू, केतू यापैकी कोणताही एक ग्रह त्याच स्थानी असेल तर मंगळ दोष नष्ट होतो.
  • मेष राशीच्या बाराव्या घरात, वृश्चिक राशीच्या चौथ्या घरात, वृषभ राशीच्या सातव्या घरात, कुंभ राशीच्या आठव्या घरात मंगळ दोष मानला जात नाही.
  • मंगळ स्वतःच्या राशीत (मेष, वृश्चिक) मूलत्रिकोण, उच्च राशी (मकर), मित्र राशी (सिंह, धनु, मीन) असेल तरही मंगल दोष नाही.
  • मुलीच्या कुंडलीत गुरू केंद्रस्थानी किंवा त्रिकोणात असल्यास मंगळ दोष नसतो.

अशा प्रकारे मंगल दोष दूर करा

  • मंगल दोष असलेल्या व्यक्तीने रोज हनुमान चालिसाचा पाठ करावा.
  • कडुलिंबाच्या झाडाची रोज पूजा करावी.
  • मांस आणि दारूपासून दूर राहिले पाहिजे.
  • भाऊ, बहीण, पत्नी यांच्याशी नाते जपावे. राग टाळावा.

ज्योतिषशास्त्रातील उपाय

  • मंगळ असलेल्या व्यक्तीने घागर, झाड किंवा मूर्तीसोबत पहिल्यांदा लग्न करावे. त्यामुळे वैवाहीक जीवनात अडचणी येत नाहीत.
  • मंगळ असलेल्या व्यक्तीला मूंगा घालण्याचा सल्ला दिला जातो.
  • हनुमानाची नित्य पूजा केल्यास मंगळ दोष दूर होतो.
  • मसूर, रक्तचंदन, लाल फुले, मिठाई आणि द्रव्य लाल कपड्यात गुंडाळून नदीत प्रवाहित केल्याने मंगल दोष दूर होतो.