scorecardresearch

रस्त्यावर पडलेला पैसा सुद्धा देतो महत्वाची शुभ-अशुभ संकेत; जाणून घ्या, घ्यावे की नाही?

अनेक वेळा पैसे रस्त्यावर पडलेले सापडतात. रस्त्यावर पडलेली ही नाणी आणि नोटा अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देतात. या नोटा किंवा नाणी उचलायची की नाही, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

money-on-road-1
(प्रतीकात्मक फोटो)

Shubh Ashubh Sanket: अनेक वेळा पैसे रस्त्यावर पडलेले सापडतात. रस्त्यावर पडलेली ही नाणी आणि नोटा अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देतात. या नोटा किंवा नाणी उचलायची की नाही, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अनेक वेळा लोक हे पैसे उचलतात आणि मग गरजूंना देतात किंवा मंदिरात दान करतात. वाटेत सापडलेला हा पैसा कोणते शुभ आणि अशुभ संकेत देतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

रस्त्यावर सापडलेला पैसा महत्त्वाचे संकेत देतात-

  • रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे म्हणजे धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि लवकरच तुम्हाला आशीर्वाद देईल. हे शक्य आहे की लवकरच तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळू शकतो.
  • रस्त्यावर नोट मिळणे म्हणजे तुमच्या काही मोठ्या अडचणी टळण्याचे संकेत आहे. तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात काही मोठे सुख येणार आहे.
  • जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल आणि त्याचवेळी तुम्हाला रस्त्यावर एक नाणे पडलेले दिसले तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमची प्लॅनिंग्स बिनदिक्कतपणे अंमलात आणले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यासोबतच जुन्या आर्थिक संकटातूनही सुटका होण्याची संकेत आहेत.
  • घरातून बाहेर पडताना वाटेत एखादे नाणे किंवा नोट सापडली तर याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. दुसरीकडे, कामावरून घरी परतताना पैसे मिळाले तर लवकरच मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत.
  • वाटेत पैशांनी भरलेली पर्स दिसली तर ते मोठ्या लाभाचे लक्षण आहे. लवकरच तुम्हाला काही मोठी मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : ग्रहांचा राजा सूर्य १४ मे पर्यंत आपल्या उच्च राशीत राहील, या ३ राशींचे भाग्य उजळणार

रस्त्यावर सापडलेले पैसे घ्यावे की नाही?
जर पैशांनी भरलेली पर्स सापडली किंवा मोठी रक्कम सापडली, तर ती ज्याच्या मालकीची आहे त्याला शोधून त्याला परत करणे कधीही चांगले. नाहीतर गरिबांना पैसे देता येतात, पण वाटेत नाणी किंवा नोटा पडून असतील तर ते तुमच्याकडे ठेवा, पण खर्च करू नका. हे पैसे तुमच्या पर्समध्ये असणे एखाद्या लकी चार्मसारखे काम करेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If you found money fallen on road know shubh ashubh sanket of these coins and currency prp

ताज्या बातम्या