Premium

२०२४ मध्ये ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? नवपंचम योग बनताच व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ मध्ये अनेक ग्रह एकमेकांशी युती करुन शुभ राजयोग तयार करणार आहेत.

Navpancham Rajyog
२०२४ मध्ये 'या' राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ मध्ये अनेक ग्रह एकमेकांशी युती करुन शुभ राजयोग तयार करणार आहेत. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर होऊ शकतो. २०२४ मध्ये मायावी ग्रह केतू कन्या राशीत भ्रमण करणार आहे. तसेच वर्षाच्या मध्यात तो गुरूसोबत नवपंचम योग तयार करणार आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब या काळात चमकू शकते. तर या भाग्यावान राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंह रास (Leo Zodiac)

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण केतू ग्रह २०२४ मध्ये तुमच्या राशीतून दुसऱ्या स्थानी जाणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, तुमचे अडकलेले पैसे देखील मिळू शकतात, तर करिअरमध्येही तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. ज्या लोकांचे करिअर लेखन, कला, मार्केटिंग, मीडिया आणि बँकिंगशी संबंधित आहे त्यांना नवपंचम राजयोगाचा विशेष लाभ मिळू शकतो.

कन्या रास (Kanya Zodiac)

नवपंचम राजयोग कन्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण केतू ग्रह तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्न स्थानी भ्रमण करत आहे. त्यामुळे या वर्षात केतूच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला व्यवसायात नवीन यश मिळू शकते. या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. पार्टनरशिपमध्ये काम केल्याचा तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

हेही वाचा- २०२४ मध्ये ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु होणार? गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकता मालामाल

तूळ रास (Tula Zodiac)

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरु शकतो. कारण केतू ग्रह तुमच्या राशीतून १२ व्या स्थानी भ्रमण करत आहे. या गोचरमुळे २०२४ वर्षात समाजात तुमचा सन्मान वाढू शकतो तसेच तुम्हाला करिअरशी संबंधित कामात यश मिळू शकते. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. तसेच, तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर ठरु शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In 2024 the fate of leo kanya tula zodiac signs will shine like gold as navpancham yoga becomes there is a possibility of boom in business jap

First published on: 05-12-2023 at 12:20 IST
Next Story
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींची जुनी कामे मार्गी लागणार, पाहा तुमचे भविष्य