यंदाच्या चैत्र नवरात्रीत बनतायत १६ विशेष योग, देवीच्या आशीर्वादाने हिंदू नववर्षात अनेक संधी उपलब्ध होणार?

नऊ दिवसांच्या या नवरात्रीमध्ये देवीचे आगमन होडीवरून होईल तर प्रस्थान पालखीतून होईल.

chaitra navratri 2023
शक्तीच्या उपासनेचा महान उत्सव नवरात्र चैत्र शुक्ल प्रतिपदा २२ मार्चपासून सुरु होत आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शक्तीच्या उपासनेचा महान उत्सव नवरात्र चैत्र शुक्ल प्रतिपदा २२ मार्चपासून सुरु होत आहे. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवातही होत आहे. तर यावेळी नवरात्रीत चार योगांचा विशेष योग होत आहे. ९ दिवसांच्या या नवरात्रीमध्ये देवीचे आगमन होडीवरून होईल आणि प्रस्थान पालखीतून होईल, जे अत्यंत शुभ मानले जाते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

शुक्ल व ब्रह्मयोगातील आद्य शैलपुत्रीच्या पूजेसह घटस्थापना करण्यात येणार आहे. ज्योतिषाचार्य पंडित कामेश्वर पांडे आणि सुनील कुमार दुबे यांनी नवरात्रीला होणाऱ्या विशेष महान योगाबद्दल सांगितले की, नवरात्रीला चार ग्रहांचे परिवर्तन होणार आहे. हा योगायोग तब्बल ११० वर्षांनंतर घडत आहे. तो योग नवीन वर्षावर होत असल्याने ते अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.

हेही वाचा- पाच राजयोगांचा गुढीपाडवा! हिंदू नववर्षात ‘या’ राशींच्या नशिबाला मिळू शकते कलाटणी; तुम्हाला धनलाभ कधी?

हे असतील विशेष योग –

यावेळी नवरात्रीमध्ये चार सर्वार्थ सिद्धी, चार रवियोग, दोन अमृत सिद्धी योग, दोन राजयोग आणि द्विपुष्कर व गुरु पुष्य यांचा प्रत्येकी एक योग जुळून येणार असल्याचे ज्योतिषांनी सांगितले. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे ३० मार्च रोजी रामनवमीला महागौरी पूजन आणि गुरु पुष्य योगाचा दुर्मिळ संयोग होणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीची संधी –

हेही वाचा- ३१ मार्चला बुध- शुक्र- राहू येणार एकत्र; ‘या’ राशींना श्रीमंतीची संधी, ‘या’ रूपात कमावू शकता बक्कळ पैसे

या वर्षाचा राजा बुद्ध आणि मंत्री शुक्र असेल. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकते. महिलांच्या उन्नतीसाठीही यंदा विशेष संधी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसंच प्रतिपदा तिथी २१ मार्च रोजी ११ वाजून ४ मिनिटानी असेल. त्यामुळे २२ मार्चला सूर्योदयाबरोबरच नवरात्रीची सुरुवात कलश स्थापनेने होईल.

रामनवमी –

३० मार्चला महागौरीच्या पूजे बरोबर रामनवमी साजरी केली जाणार आहे. ३१ मार्च रोजी हा उत्सव साजरा होणार आहे. बुधवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. दुर्गा सप्तशतीनुसार बुधवारपासून मातेचे आगमन होडीतून होईल जे पीक, धन-धान्य आणि विकासासाठी लाभदायक मानले जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 18:37 IST
Next Story
पाच राजयोगांचा गुढीपाडवा! हिंदू नववर्षात ‘या’ राशींच्या नशिबाला मिळू शकते कलाटणी; तुम्हाला धनलाभ कधी?
Exit mobile version