scorecardresearch

२०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना मिळणार ताऱ्यांची साथ; शनि आणि गुरू ग्रह देणार श्रीमंत बनण्याची संधी

Lucky Zodiac Sign In २०२३: नवीन वर्ष कोणत्या राशींना भरभराटीचे जाईल ते जाणून घ्या..

२०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना मिळणार ताऱ्यांची साथ; शनि आणि गुरू ग्रह देणार श्रीमंत बनण्याची संधी
फोटो: संग्रहित

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत येणारे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडतो. म्हणजे जे व्यापारी आहेत त्यांचा व्यवसाय कसा चालणार. तसेच नोकरी करणाऱ्यांचे व्यावसायिक जीवन कसे असेल. २०२३ मध्ये गुरु आणि शनि सारखे मोठे ग्रह त्यांच्या राशी बदलणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. चला जाणून घेऊया कोणकोणत्या राशी आहेत ज्यांना नवीन वर्षात यश मिळू शकते..

मेष राशी

तुम्हाला २०२३ मध्ये करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या वर्षी तुम्हाला शनिदेव आणि गुरु ग्रहाचा आशीर्वाद मिळू शकतो. या वर्षी तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तसेच, व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. शनिदेवाच्या प्रभावाने तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. या काळात तुम्हाला फक्त तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागेल, तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते.

( हे ही वाचा: ३० महिन्यांनी शनिदेवाचा कुंभ राशीत प्रवेश; २०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना प्रचंड पैसा मिळण्याची संधी)

धनु राशी

या वर्षी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कारण जानेवारीत शनिदेवाचे संक्रमण होताच तुम्हा लोकांना साडेसतीपासून मुक्ती मिळेल. त्यानंतर प्रगतीचे नवे मार्ग तयार होतील. तसेच, तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. यावेळी तुम्हाला नवीन ऑर्डर मिळतील. ज्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तसेच जे नोकरीत आहेत, त्यांना बढती मिळू शकते.

कुंभ राशी

२०२३ हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले आहे. तसेच या वर्षी तुमचे उत्पन्न वाढू शकते. दुसरीकडे, शनिदेवाच्या प्रभावाने तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. तसेच जे स्पर्धक विद्यार्थी आहेत त्यांना यश मिळू शकते. म्हणजे तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. या वर्षी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळू शकतो. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय शनिदेवाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हे वर्ष आश्चर्यकारक सिद्ध होऊ शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 19:31 IST

संबंधित बातम्या