Rashi Bhavishya 6 october 2026 In Marathi : आज ६ ऑक्टोबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असणार आहे. आज साध्य योग आणि आश्लेषा नक्षत्र जुळून येईल. राहू काळ ३ वाजून २५ मिनिटांनी सुरु होईल ते ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त ११ वाजून ४६ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज इंदिरा एकादशी असणार आहे. तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ६ ऑक्टोबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 6 october 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामातून समाधान मिळवाल. अनावश्यक तर्क- वितर्क करू नयेत.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
मुलांकडून आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. मित्रांविषयी मनात ग्रह करून घेऊ नका.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
घरातील कामात व्यस्त राहाल. कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. कठीण कामात चिकाटी सोडू नका.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
विद्यार्थ्यानी मेहनतीला कमी पडू नये. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या. नातेवाईकांची गाठ पडेल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
स्वत:वर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
वैचारिक भावना वाढीस लागेल. घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकाल. नातेसंबंध दृढ होतील.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल. येणार्या काळात ओळखीचा फायदा होईल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
काही खर्च अचानक येतील. अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
स्पर्धेत यश मिळवाल. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. ध्यानधारणेतून मानसिक तणाव कमी होईल.
