Ekadashi in Pitru Paksha 2023: वाडवडिलांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी व आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्ष पाळला जातो. २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२३ हा यंदाचा पितृपक्षाचा कालावधी आहे. आजचा दिवस पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा व खास मानला जातो कारण पंधरवड्यातील एकादशी आहे. आजच्या एकादशीला इंदिरा एकादशी असेही म्हणतात. विशेष म्हणजे आजच्या ग्रहमानानुसार इंदिरा एकादशीला काही खास योग जुळून आलेले आहे. यातील एक योगायोग म्हणजे आज आठवड्यातील शुभ दिवसांपैकी एक मानला जाणारा असा मंगळवार आहे. तर आज मघा नक्षत्रात साध्य, शुभ व धन योग जुळून येत आहे. याचा प्रभाव ५ राशींवर दिसून येण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या कुंडलीत आजपासूनच महत्त्वाचे बदल दिसू लागतील ज्यामुळे त्यांना अतिश्रीमंत होण्याची सुद्धा संधी आहे.

पितृपक्षातील इंदिरा एकादशीपासून ‘या’ राशी होणार मालामाल?

धनु रास (Sagittarius Zodiac Signs)

धनु राशीसाठी आजचा दिवस व साधारण दिवाळी पाडव्यापर्यंतचा कालावधी हा लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला तुमच्याच कामाचे पूर्ण श्रेय व मोबदला मिळेल त्यामुळे कुठेतरी कष्टाचे चीज झाल्याची भावना मनी प्रबळ होईल. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ लाभू शकते. तुमच्या भाग्यात नोकरी बदलाचे संकेत आहेत. व्यावसायिकांना विशेष लाभ होऊ शकतो.

मिथुन रास (Gemini Zodiac Signs)

पितृ पक्ष एकादशीचे शुभ योग तुमच्या अत्यंत फायद्याचे सिद्ध होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्यासाठी आई- वडील किंवा घरातील वाडवडिलांची साथ लाभू शकते. नोकरदार मंडळींची दगदग वाढू शकते पण तुम्हाला या कष्टाचा मिळणारा मोबदला नेहमीपेक्षा प्रचंड मोठा असू शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी जरूर घ्या पण कंटाळा करू नका. तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागू शकते.

कन्या रास (Virgo Zodiac Signs)

इंदिरा एकादशीपासून कन्या राशीला धन योगाचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नव्याने काही लोकांशी जुळवून घ्यावे लागेल. संयमाची परीक्षा घेतली जाईल पण तुम्ही हार मानू नका कारण तुम्हाला याचा मिळणारा लाभ हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. धनलाभ होत असल्याने इच्छापूर्तीचे सुद्धा योग आहेत. वाहन किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. सोन्यात पैसे गुंतवणे सुद्धा हिताचे ठरू शकते.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Signs)

वृश्चिक राशीसाठी १० ऑक्टोबर पासून सुवर्णकाळ सुरु होत आहे. विशेष नोकरदार मंडळींना आर्थिक मिळकतीच्या कक्षा रुंदावण्याची मोठी संधी मिळू शकते. समाजातील तुमचे स्थान व मान भक्कम होऊ शकते. सरकारी योजनांचा लाभ होऊ शकतो. तुम्हाला अनपेक्षित व अचानक लाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आयुष्यात नवीन नाती जोडली जाऊ शकतात.

हे ही वाचा<< पितृपक्ष अष्टमीला सर्वार्थ सिद्धी योग! ‘या’ 5 राशींना लाभणार पूर्वजांची कृपा; प्रचंड श्रीमंतीसह दार ठोठावणार लक्ष्मी

कुंभ रास (Aquarius Zodiac Signs)

कुंभ रास सध्या शनीच्या नक्षत्र परिवर्तनासाठी सज्ज होत आहे. पण अशातच दोन दोन राजयोग तुमच्या कुंडलीत प्रभावी असल्याने तुम्हाला कामाचा वेग वाढल्याचे जाणवेल. विशेष म्हणजे याच कामांमधून तुम्हाला होणारा धनलाभ व प्रतिष्ठा सुद्धा तुमच्यापर्यंत अधिक वेगाने येऊ शकते. तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. झोपेबाबत तक्रारी जाणवू शकतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)