Venus Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशीपरिवर्तन पाहायला मिळते. आज (ता. १२ जून) सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी कला, सुख, समृद्धी आणि आकर्षणाचा कारक ग्रह शुक्र वृषभ राशीमधून मिथुन राशीत राशीपरिवर्तन करेल. शुक्राच्या या राशीपरिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम पाहायला मिळेल. या राशीत शुक्र ६ जुलै २०२४ पर्यंत राहील.

मेष

शुक्राचे राशीपरिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारे ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील, ज्यामुळे लोक तुमच्यावर इंप्रेस असतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. आरोग्य समस्या दूर होतील. मेहनीचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशीपरिवर्तनाने शुभ परिणाम पाहायला मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीदेखील शुक्राचे राशीपरिवर्तन खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल.

हेही वाचा: धनलाभ होणार; १४ जूनला निर्माण होणार ‘भद्र राजयोग’, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशीपरिवर्तनाने खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)